शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर, शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 14, 2024 13:52 IST

पेन्शन राज्य अधिवेशनात आवाज बुलंद : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आक्रमक

अमरावती : राज्यात १ नोव्हेंबर २००५ रोजी त्यानंतर शासन नोकरीत लागलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी, अशी विविध संघटनांची मागणी आहे. जो पक्ष ही मागणी मान्य करेल त्यालाच मतदान अशी भूमिका आता संघटनांनी घेतली आहे. यासाठी १५ सप्टेंबरच्या शिर्डी येथील पेन्शन राज्य संमेलनात आवाज बुलंद करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सतत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विविध आंदोलन राज्यभर करीत आहे. मात्र, सरकार जुनी पेन्शन न देता डीसीपीएस, एनपीएस, आता केंद्र सरकारची यूपीएस व राज्याची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जीपीएस आदी योजना आणत आहे. मात्र, या सर्व योजना कर्मचारी यांच्या भविष्याच्या हिताच्या नसून फक्त काहींच्या फायद्याच्या असल्याचा आरोप संघटनेद्वारा करण्यात आला.

कर्मचारी व अधिकारी यांनी यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गौरव काळे, अतुल कडू, कुंदन ठाकूर, योगेश पखाले, कासीम जमादार, आशिष ढवळे, संचिता गोगटे, प्रवीण निंभोरकर, पवन साबळे, प्रज्वल घोम, रितेश जगताप, यश बहिरम, सुधीर बहादे, स्वप्नील देशमुख, भावना राऊत, प्राजक्ता राऊत, प्रिया पळसकर, योगिता वाकोडे, रूपाली झोड, प्रीती दिवाण आदींनी केले आहे.

राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने जाहीर करावी भूमिकाया सर्व योजना व सरकारचा वेळकाढूपणा लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने या अधिवेशनात त्यांची भूमिका सदर ठिकाणी जाहीर करावी, असे आवाहन संघटनेद्वारा करण्यात आले. अधिवेशनात किमान चार लाख अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नामदेव मेटांगे यांनी सांगितले.

अधिवेशनात ही राहणार प्रमुख मागणी१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर लागलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्त वेतन नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम १९८४ तथा भविष्य निर्वाह निधी जीपीएफसह सर्व अनुषंगिक लाभासह जुनी पेन्शन लागू करणे, ही अधिवेशनात प्रमुख मागणी राहणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीPensionनिवृत्ती वेतनgovernment schemeसरकारी योजना