शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकाने दोन लाख उकळले; महिलेकडून तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 11:13 IST

Amravati : प्रश्नचिन्ह'च्या तत्कालीन मुख्याध्यापकाकडून बनावट नियुक्तिपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील 'प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेत स्वयंपाकी पदावर नोकरी लावून देण्यासाठी तत्कालीन मुख्याध्यापकाने दोन लाख रुपये उकळले. त्याने एकूण सात लाखांची मागणी केली होती, अशी तक्रार मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्यात महिलेकडून नोंदविण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, वहिता नूरदास भोसले (२९, रा. पारधी बेडा, मंगरूळ चव्हाळा) असे तक्रारदाराचे, तर प्रशांत बबन गोरामण (३२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तत्कालीन मुख्याध्यापकाचे नाव आहे. १ सप्टेंबर २०२२ रोजी वहिता भोसले यांना मुख्याध्यापक प्रशांत गोरामण याने सात लाखांची मागणी करीत स्वयंपाकी पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखविले. ही प्रचंड मोठी रक्कम असल्याने ती देऊ शकत नाही, असे म्हणताच त्याने तूर्तास दोन लाख रुपये दे , असे सांगितले. उर्वरित पाच लाख रुपये या पदाचे अॅप्रूव्हल आल्यानंतर पगारातून कापले जातील, असे स्पष्ट केले. वहिताने दोन लाख रुपये दिल्यानंतर तिला शाळेच्या लेटर पॅडवर नियुक्तिपत्र मिळाले. तिने या पदावर कामदेखील केले. तथापि, स्वयंपाकी पदाकरिता प्रस्तावच नसल्याचे काही दिवसांनंतर तिच्या निदर्शनास आले. खोटे नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी प्रशांत गोरामणविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविला. 

समाजाने हेटाळणी केलेल्या मुलांच्या सक्षमीकरणासाठी 'प्रश्नचिन्ह' मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह स्कूल ही महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील अनाथ आणि आदिवासी, विशेषतः फासेपारधी समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण आणि निवासी सुविधा पुरवण्यासाठी समर्पित ना-नफा संस्था आहे. या वंचित मुलांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे दर्जेदार शालेय शिक्षण तसेच त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय मतीन भोसले यांनी बाळगले आहे.

"प्रशांत गोरामण यांनी उदात्त विचारांनी सुरू केलेल्या कार्यावर, संस्थेवर अनेक आरोप लावले होते. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत कागदपत्रेही बनावट आढळून आली होती. त्यामुळे मार्च २०२४ च्या सुमारास त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे."- मतीन भोसले, संस्थापक, प्रश्नचिन्ह

 

टॅग्स :Amravatiअमरावतीfraudधोकेबाजी