सासरा आणि दिराकडूनच दोन महिन्यांपासून सुरू होते अत्याचार, प्रकरण ऐकून पोलिसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 14:36 IST2026-03-08T14:27:48+5:302026-03-08T14:36:48+5:30

एका ३० वर्षांच्या विवाहितेवर तिचा सासरा आणि दीर मागील दोन महिन्यांपासून सातत्याने अत्याचार करत होते. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसही अवाक् झाले. 

The atrocities were being committed by the father-in-law and brother-in-law for two months, the police were also shocked after hearing the case | सासरा आणि दिराकडूनच दोन महिन्यांपासून सुरू होते अत्याचार, प्रकरण ऐकून पोलिसही हादरले

सासरा आणि दिराकडूनच दोन महिन्यांपासून सुरू होते अत्याचार, प्रकरण ऐकून पोलिसही हादरले

नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात उघडकीस आली. एका ३० वर्षीय विवाहितेवर तिच्याच सासऱ्याने आणि दिराने गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी ६ मार्च रोजी गुन्हा दाखल करून आरोपी सासऱ्याला अटक केली, तर पीडितेचा दीर पसार झाला आहे.

एफआयआरनुसार, पीडित महिला ही ३० वर्षांची असून ती मतिमंद आहे. तिचे लग्न तीन वर्षांपूर्वी चांदूर रेल्वे तालुक्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीशी झाले होते. पीडितेचा पतीदेखील मतिमंद आहे. 

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे सासरे (वय ६९) आणि तिचा दीर हे दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होते. हा प्रकार सहन न झाल्याने पीडितेने आपली आपबिती आईला सांगितली. 

पीडितेच्या आईने तत्काळ आपल्या पतीला अर्थात पीडितेच्या वडिलांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी चांदूर रेल्वे ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पिडितेच्या सासऱ्याला पोलिसांनी ६ मार्च रोजी रात्री ११ वाजता अटक केली आहे. 

Web Title : ससुर और देवर ने दो महीने तक महिला से कथित तौर पर बलात्कार किया

Web Summary : अमरावती के चांदुर रेलवे में एक 30 वर्षीय मानसिक रूप से विकलांग महिला के साथ कथित तौर पर उसके ससुर और देवर ने दो महीने तक बलात्कार किया। पुलिस ने ससुर को गिरफ्तार किया; महिला द्वारा अपनी मां को सूचित करने के बाद देवर फरार है।

Web Title : Father-in-law and Brother-in-law Allegedly Raped Woman for Two Months

Web Summary : A 30-year-old mentally challenged woman in Chandur Railway, Amravati, was allegedly raped by her father-in-law and brother-in-law for two months. Police arrested the father-in-law; the brother-in-law is absconding after the woman informed her mother.