दहा वर्षांतील वनक्षेत्राच्या आगीचे 'ऑडिट'; पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 19:26 IST2020-01-05T19:25:13+5:302020-01-05T19:26:33+5:30
वनवणव्याचे नियोजन प्रारंभ

दहा वर्षांतील वनक्षेत्राच्या आगीचे 'ऑडिट'; पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट लक्ष्य
अमरावती: दरवर्षी वनक्षेत्र, जंगलांना सततच्या लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी वनविभागाने नियोजन चालविले आहे. गत १० वर्षांत वनक्षेत्रात सलग लागलेल्या आगीची माहिती गोळा करण्यात येत आहे. ही आग नैसर्गिक की मनुष्यनिर्मित? याचा शोध घेतला जाणार आहे. पेंच, ताडोबा, टिपेश्र्वर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आग प्रामुख्याने लक्ष्य केणार आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ फेब्रुवारी २०२० पासून जंगलक्षेत्रात आगीचा हंगाम सुरु होण्याचा पार्श्वभूमीवर युद्धस्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. व्याघ्र प्रकल्प आणि वनक्षेत्रात आग नियंत्रणासाठी निधीची आवश्यकता आणि उपाययोजनांसाठी २ जानेवारीला महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. व्याघ्र प्रक ल्प, वन विभाग आणि वन विकास महामंडळांच्या नियंत्रणातील जंगलात आग लागत असल्याचे मंथन झाले.
विशेषत: गेल्या १० वर्षात ठराविक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. आगप्रकरणी आरोपी अटकेत, वन्यजीवांचे नुकसान, संवेदनशील क्षेत्रात अतिरिक्त मनुष्यबळ, विशेष कॅम्प तयार करणे, स्थानिकांमध्ये जनजागृती, वाहनांची गरज, पर्यायी इंधन पुरवठा आदींबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनवणवा रोखण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
१५ जानेवारीपासून जाळ रेषा विशेष मोहीम
आगीचे हंगाम १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२० या दरम्यान जंगलक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे ही विशेष राबविली जाणार आहे. त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक, अग्निरोधक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.
दहा वर्षांत २५ हजार हेक्टर वनक्षेत्र खाक
राज्यात वनक्षेत्र आणि जंगलांना लागलेल्या आगीत गत १० वर्षांत २५ हजार वनक्षेत्र खाक झाल्याच्या आकडेवारीवर बैठकीत वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एप्रिल, मे या दोन महिन्यात जंगलांना आग लागत असून, याच काळात जंगलाचे रक्षण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. आगीच्या घटनांमध्ये ºहास होण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
वनक्षेत्रांना आग लागूच नये, यासाठी वनाधिकाऱ्यांच्या पहिल्याच बैठकीत सूचना दिला जातील. आग रोखण्यासाठी उपाययोजनांकरिता निधी कमी पडू देणार नाही. जंगलासह वन्यजीवांचे रक्षणाला प्राधान्य दिले जाईल.
- संजय राठोड,वनमंत्री, महाराष्ट्र