शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर संत गुलाबबाबा मंदिरातील चोरीचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातून २२ किलो ७० ग्रॅम वजनाची चांदीची चादर, छत्री, पादुका व पत्रा असा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गोपाल उमक यांनी   २८ जानेवारी रोजी अंजनगाव पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आशिष चौधरी, किशोर मोतिंगे  व त्यांचे पथक अंजनगाव हद्दीत मालमत्तेसंबंधी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना, टाकरखेडा मोरे येथील मंदिरातील चोरीचा आरोपी दत्तघाट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

ठळक मुद्देदोन आरोपी अटक : १२.७० लाखांचा मुद्देमाल जप्त; दोनदा केली चोरी

  लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातील चोरीप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांनी टाकरखेडा मोरे येथील चोरीसह अन्य एका घरफोडीची कबुली दिली आहे. आरोपींकडून १२ लाख ७० हजार ६२० रुपये किमतीची चांदी जप्त करण्यात आली आहे. शेख आरिफ ऊर्फ काला आरीफ शेख हारून (३५, अंजनगाव सुर्जी) व सलीम खाँ नईम खाँ (२६, कोकाटखेल, ता. अंजनगाव सुर्जी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. टाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरातून २२ किलो ७० ग्रॅम वजनाची चांदीची चादर, छत्री, पादुका व पत्रा असा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत गोपाल उमक यांनी   २८ जानेवारी रोजी अंजनगाव पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने या चोरीचा तपास करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आशिष चौधरी, किशोर मोतिंगे  व त्यांचे पथक अंजनगाव हद्दीत मालमत्तेसंबंधी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना, टाकरखेडा मोरे येथील मंदिरातील चोरीचा आरोपी दत्तघाट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून ४ डिसेंबर रोजी आरोपी काला आरीफ व सलीम खाँ यांना दत्तघाट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही आरोपींनी गुलाबबाबा मंदिरात दोनदा चोरी केल्याची कबुली दिली. त्यासोबतच आरोपी शेख आरीफ याने अंजनगाव सुर्जीतील सायराबानो मो. रहमान यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. संत गुलाबबाबा मंदिरातील १२ लाख ७० हजार रुपये किमतीची २ किलो १७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. शेख आरीफ हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याने घरफोडी व चोरीचे गुन्हे केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे व अंजनगावचे ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी एलसीबी पथकाने केली.

११ महिन्यांनंतर मिळाले आरोपीटाकरखेडा मोरे येथील संत गुलाबबाबा मंदिरस्थळी हजारो भाविक श्रद्धेने नतमस्तक होत असतात. त्याच मंदिरातून तब्बल २२ किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तथापि, ११ महिन्यानंतर का होईना, पोलिसांना चांदीचोर पकडण्यात यश आले. 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस