शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना टरबूज-खरबूज शेतीचे धडे

By admin | Updated: May 7, 2015 00:04 IST

मेळघाटात वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक सेवा देणाऱ्या रवी कोल्हे, स्मिता कोल्हे कुटुंबाने येथे आधुनिक शेती व्यवसायात ...

मेळघाटात प्रयोग : कोल्हे कुटुंबीयांनी फुलविली आधुनिक शेतीधारणी : मेळघाटात वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक सेवा देणाऱ्या रवी कोल्हे, स्मिता कोल्हे कुटुंबाने येथे आधुनिक शेती व्यवसायात भरारी घेतली. उन्हाळ्यातील चवदार गोड फळ टरबूज व खरबूजची शेती करून आदिवासी शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला. एकरी दोन लाख रुपयांचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. वैद्यकीय व सामाजिक सेवेत नावलौकिक मिळविणारे रवी कोल्हे, स्मिता कोल्हे यांचे लवादाजवळील कोलूपूर येथे शेत आहे. शेतीत ३ महिन्यांतच चवदार फळ टरबूज आणि खरबूजाची शेती फुलविली. यातून आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय आदिवासी शेतकऱ्यांच्या नजरेत आणून दिला. कोल्हे दाम्पत्यांनी बियाण्यांची योग्य निवड स्थानिक हवामान, जमिनीची पोत, पाण्याच्या घसरत्या पातळीच्या अनुषंगाने शेतात पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले. एक प्रयोग म्हणून व्यावसायिक स्तरावर मुस्कान नावाच्या खरबूज तर मेघना नामक टरबुजाची पेरणी करुन प्लास्टिकचे पांघरुन घालण्यात आले. मेळघाटात विजेचा लपंडाव, कमी विद्युत दाब, अवकाळी पाऊस, गारपीट वादळ यांना तोंड देत त्यांनी टरबूजाची शेती यशस्वीपणे केली आहे. एकरी खर्च ६० हजार रुपये लागला असून १२ टन उत्पादन घेतले. मेळघाटात मालाला मागणी कमी असली तरी १८ रुपये प्रतिकिलो दराने हा माल उत्तरप्रदेशात विकला जात आहे. मेघना नामक फळ काळेशार आहे. मुस्कानचे आतून रंग केशरी व चवीने गोड आहे. दोन्ही उत्पादनात १७ टक्के साखरेचे प्रमाण आहे. मेळघाटात परंपरागत धान्याची शेती तोट्यात जात असल्याने रवी कोल्हे यांनी टरबूज व खरबूज फळाच्या शेतीचा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखविला.ग्लोबल वार्मिंगच्या काळात मेळघाटातही निसर्गाने अवकृपा केली. कमी विद्युतदाब, विजेचा लपंडाव, २० तासांचे भारनियमन या कारणांमुळे धान्याची शेती करणे तोट्यात येत आहे. यासाठी ३ महिन्यांच्या कालावधीत टरबूज व खरबुजाची लागवड करुन भरघोस उत्पादन घेता आले. यासंधीचा आदिवासी शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल. -डॉ. रवी कोल्हे, समाजसेवक, धारणी