मोर्शीतील शिक्षक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:20+5:302021-02-05T05:29:20+5:30

मोर्शी शहरातील एका नामांकित शाळेत दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे. या शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पालक व ...

Teacher couple Corona positive in Morsi | मोर्शीतील शिक्षक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह

मोर्शीतील शिक्षक दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह

मोर्शी शहरातील एका नामांकित शाळेत दोन हजारपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या आहे. या शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पालक व विद्यार्थ्यांत खळबळ उडाली आहे. मोर्शी तालुक्यातील अनेक शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहिजे त्याप्रमाणात विद्यार्थ्यांची सुरक्षा घेतली जात नसल्याचे बोलले जात आहे. पालक व विद्यार्थी यांच्या म्हणण्यानुसार, एकाच बेंचवर दोन ते तीन विद्यार्थी बसविले जाते, पाच-पाच तास विद्यार्थ्यांना थांबून ठेवो जात आहे. महत्त्वाचे तीन ते चार विषय शिकवण्याचे बंधन असताना शाळेच्या सर्वच तासिका घण्यात येत आहेत. संपूर्ण शाळा व वर्ग सॅनिटायजेशन केल्या जात नाही. पुरेशा प्रमाणात स्वच्छता ठेवली जात नाही. थर्मल स्कीनिंग नसते, तसेच येता-जाता विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. याची दखल ना शिक्षण विभाग घेत, ना शालेय प्रशासन. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने आमचे पाल्य आम्ही शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Teacher couple Corona positive in Morsi