अहमदाबादहून परत आणलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 10:46 PM2019-01-05T22:46:48+5:302019-01-05T22:47:16+5:30

किचकट व अवजड कामे करीत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूने बोथरा गावात शोककळा पसरली आहे.

Suspicious death of a youth who returned from Ahmedabad | अहमदाबादहून परत आणलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

अहमदाबादहून परत आणलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू

Next
ठळक मुद्देबोथरा गावात शोककळा : १ डिसेंबरपासून बेपत्ता, शुक्रवारी आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : किचकट व अवजड कामे करीत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूने बोथरा गावात शोककळा पसरली आहे.
खुशियाल रामलाल जावरकर (२२, रा. बोथरा) असे मृताचे नाव आहे. धारणी तालुक्यातील बोथरा येथील १० मुलांकडून सुलभ काम व जादा पगाराच्या आमिंषातून अवजड कामे करून घेतली जात होती. अहमदाबाद येथे त्याच्यासह काम करीत असलेल्या या मुलांच्या सुटकेसाठी धारणी पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान राबविले. २७ डिसेंबरला या मुलांना बोथरा येथे परत आणले होते. या संपूर्ण मोहिमेत खुशियाल हा महत्त्वाचा दुवा होता. त्याने स्वत:कडील मोबाइलद्वारे या मुलांबाबत राइज फाउंडेशनचे ऋषीकेश खिलारे यांना माहिती कळविली. त्यांच्या माध्यमातून धारणी पोलिसांना सूचना देण्यात आल्या.
२७ डिसेंबरला ही मुले आई-वडिलांकडे परत आली. परंतु, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच ‘आॅपरेशन मुस्कान’चा मुख्य दुवा असलेला खुशियाल बेपत्ता झाला होता. गावकऱ्यांकडून त्याचा शोध घेतला जात असताना, शुक्रवारी सायंकाळी गावातील जंगलामध्ये गुराखी श्रावण कालू धुर्वे यांनी खुशियालचे मृतदेह पाण्याच्या डबक्यात पाहिला. जमादार प्रमोद बाळापुरे आणि शिपाई राजेश अहिर यांनी त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय आणला. शनिवारी सकाळी डॉक्टर दिनकर पाटील यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर खुशियालचा मृतदेह त्यांच्या पालकांचे स्वाधीन केला.
वडील रामलाल जावरकर यांचेकडे एक एकर कोरडवाहू जमीन असून, त्यातून कोणतेही उत्पन्न होत नसताना आपला खांदा पुरुष अचानक पणे सोडून गेल्यामुळे रामलालच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
मजूर कंत्राटदाराकडून घातपात?
खुशियाल हा आॅपरेशन मुस्कानचा ‘की पर्सन’ होता. त्याने लपविलेल्या मोबाइलमुळे अहमदाबाद येथील रंग कंपनीमधून १० मुलांची सुटका करता आली. याप्रकरणी मजूर ठेकेदाराकडून घातपाताची शंका सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश खिल्लारे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

आॅपरेशन मुस्कान मोहिमेंतर्गत बोथा गावातील या १० मजुरांना गुजरातमधून परत आणण्यात आले, त्यात खुशियालचा समावेश होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- विलास कुळकर्णी,
पोलीस निरीक्षक, धारणी

Web Title: Suspicious death of a youth who returned from Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.