शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! नववीच्या वर्गातील पाच हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

गतवर्षी नववीत ४५८४४ विद्यार्थी पटसंख्या होती. यात २३८३० मुले, तर २२०१४ मुलींची संख्या होती. त्यापैकी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ४०६६३ विद्यार्थी परीक्षेत प्रवेशित होते. नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश केला असताना ५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले तर नाही, अथवा बाहेरगावी तर गेले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरलाच नाही, दहावीच्या पटसंख्येत कमालीची तफावत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पहिली ते नववीपर्यंतच्या  विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. असे असताना जिल्ह्यातील नववी  उत्तीर्ण झालेल्या ५२२१ विद्यार्थ्यांनी दहावीचे परीक्षा अर्ज भरले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे गेले, असा सवाल शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. नववी उत्तीर्ण होऊनही दहावीत प्रवेश किंवा परीक्षा न देणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत.
गतवर्षी नववीत ४५८४४ विद्यार्थी पटसंख्या होती. यात २३८३० मुले, तर २२०१४ मुलींची संख्या होती. त्यापैकी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ४०६६३ विद्यार्थी परीक्षेत प्रवेशित होते. नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश केला असताना ५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले तर नाही, अथवा बाहेरगावी तर गेले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र, पटसंख्येवर दर्शवून विद्यार्थ्यांची आकडेवारी फुगवून दाखविली जाते, असे यातून स्पष्ट होते. त्यामुळेच नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीत प्रवेश वा परीक्षा दिली नाही, हे पुढे आले. 

पटसंख्येचा घोळ
शाळेच्या पटसंख्येवर विद्यार्थी कमी दिसू नये, यासाठी पहिलीपासूनच आकडेवारी फुगवून दर्शविली जाते. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थी संख्या कायम दिसते.
काही विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतरही ते पटसंख्येवर कायम असतात. शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असतो.
विशेषत: शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्येवर नसताना तो विद्यार्थी प्रवेशित असल्याचा हा प्रकार नित्याचीच बाब झाली आहे.

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर 
- नववीनंतर पुढे शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही कुटुंबांत आर्थिक चणचण जाणवत असल्याने रोजगाराच्या शोधासाठी विद्यार्थी शिक्षण सोडतात.
- काही आई-वडील मुलगी दहाव्या वर्गात पोहोचली की, १५ व्या वर्षीच विवाह करून मोकळे होतात. हा बालविवाह असतानासुद्धा समाजात यासंदर्भात दखल घेतली जात नाही. विशेषत: दुर्गम, आदिवासी भागात असा प्रकार अधिक जाणवतो.
- मजूर कुटुंब स्थलांतरित होते. त्यामुळे नववीनंतर दहावीत प्रवेश न घेता    रोजगाराकडे विद्यार्थी वळतात, त्यामुळे  पुढील शिक्षणाला ब्रेक लागतो.

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या