शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर गाव योजनेचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेचे ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेचे पुरस्कार १६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जाहीर केले. यामध्ये १३ तालुक्यांत प्रत्येकी एक, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन गावांना विभागून अशा १५ गावांना तालुकास्तरावर, तर दोन गावांना संयुक्तरीत्या जिल्हास्तरावरचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८४० ग्रामपंचायतींपैकी अधिक गुण प्राप्त करणाऱ्या २१० ग्रामपंचायतींची गटविकास अधिका०यांमार्फत क्रॉस चेकिंग करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतींचे अहवाल जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाकङे सादर करण्यात आले होते. आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या तालुकास्तरीय समितीकडून गुणांकन व मूल्यांकन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत गाव पाहणी अभिलेख्यांची व गुणांची पडताळणी करून ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आले होते. तालुकास्तरावर १५ ग्रामपंचायती पात्र ठरल्या. यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुसनेर व मोखड या दोन ग्रामपंचायतींना पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला. १४ तालुक्यांतून अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा आणि चांदूर बाजार तालुक्यातील गाेविंदपूर या दोन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरचा पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला. तालुकास्तरावर पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाखांचा आणि जिल्हास्तरावर ४० लाखांचा रोख स्वरूपात पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर यांनी दिली.

बॉक्स

तालुकास्तरावर पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती

रेवसा (अमरावती). सोमवारखेडा (भातकुली). पुसनेर व मोखड (नांदगाव खंडेश्वर). जावरा (तिवसा). लेहगाव (मोर्शी). सावंगा (वरूड). कापूसतळणी (अंजनगाव सुर्जी). दुनी (धारणी). गौलखेडा बाजार (चिखलदरा). शिंगणापूर (दर्यापूर). गोविंदपूर (चांदूर बाजार). सावळी दातुरा (अचलपूर). सावंगी संगम (चांदूर रेल्वे). कामनापूर घुसळी (धामणगाव रेल्वे).

जिल्हास्तरावर पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती

सावळी दातुरा (अचलपूर) व गाेविंदपूर (चांदूर बाजार)

कोट

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावांची तपासणी केली असता, दोन ग्रामपंचायती अव्वल आढळल्या. यंदा सर्वच गावांना स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद लाभला.

- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद