सारांश/ बातमी पान १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST2021-03-04T04:21:49+5:302021-03-04T04:21:49+5:30

धारणी : शेतीच्या जुन्या वादातून काठी, लाथा, बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना १ मार्च रोजी गोलाई येथे घडली. सज्जन चुन्नीलाल ...

Summary / News Page 1 | सारांश/ बातमी पान १

सारांश/ बातमी पान १

धारणी : शेतीच्या जुन्या वादातून काठी, लाथा, बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना १ मार्च रोजी गोलाई येथे घडली. सज्जन चुन्नीलाल कासदेकर यांच्या फिर्यादवरून रामरतन चुन्नीलाल कासदेकर, रवि चुन्नीलाल कासदेकर, दिलीप चुन्नीलाल कासदेकर या तिघांविरुद्ध भादंविच्या ३२४. ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. याप्रकरणी धारणीचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

-----------------

खाेलापूर येथे वाहन जाळले

खल्लार : क्षुल्लक कारणाने वाहन जाळल्याची घटना १ मार्च रोजी खोलापूरच्या मोमीनपुरा येथे घडली. याप्रकरणी अब्दुल रहमान अब्दुल रज्जाक, अब्दुल अखिल अब्दुल रहमान, अब्दुल राजीक अब्दुल रहमान (रा. खोलापूर) असे आराेपींचे नाव आहे. अब्दुल शोएब अब्दुल सादीक यांच्या फिर्यादीनुसार एम.एच. २८, ए.बी. ११०४ क्रमांकाचे वाहन जाळले. खोलापूर पोलिसांनी भादंविच्या ४३५, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------

खिडकीतून मोबाईल चोरी

नांदगाव खंडेश्वर : घरात खिडकी ठेवलेला मोबाईल चोरी गेल्याची घटना सोमवारी सातरगाव येथे घडली. प्रशांत शेषराव काकडे (४०, रा. सातरगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३८०, ४५४ अन्वये गुन्हा नोंदविला. आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. नांदगाव खंडेश्वर पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Summary / News Page 1