तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 21:28 IST2021-01-07T21:27:44+5:302021-01-07T21:28:08+5:30
Farmer Suicide : सायंकाळी गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी पार पडला.

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
ठळक मुद्देगुरुवारी सकाळी ही घटना उघड झाली. संदीप दादाराव कुरळकर (३६) असे मृताचे नाव आहे.
तिवसा (अमरावती) : तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे तरुण विवाहित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघड झाली. संदीप दादाराव कुरळकर (३६) असे मृताचे नाव आहे.
दोन एकर शेतीत उत्पन्न घेऊन परिवाराचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या संदीपने नापिकी व आर्थिक संकटाच्या विवंचनेतून गावातील स्मशानभूमीलगतच्या पुलावर विष प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सायंकाळी गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी पार पडला.