शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा तडाखा, शेतकऱ्यांचा घास हिरावला

By admin | Updated: March 1, 2015 00:18 IST

शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊ स बरसला. बेसावधक्षणी आलेल्या वादळामुळे शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाली.

अमरावती : शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह पाऊ स बरसला. बेसावधक्षणी आलेल्या वादळामुळे शेकडो घरांवरील टिनपत्रे उडाली.वीज कोसळल्याने दर्यापूर तालुक्यातील उमरी येथे एका महिलेचा मृत्यू झाला. अवकाळी पावसाचा फटका रबी पिकांना बसला संत्राबागेतील मृग बहाराची संत्री झडली. चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, दर्यापूर, वरुड, धारणी तालुक्यांत वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक गावे काळाखात बुडाली. हे अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेले.वादळी पावसाचे दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्ह्यात आगमन झाले. दर्यापूर तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे प्रचंड हानी झाली. पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून उमरी येथे आलेल्या महिलेचा वीज अंगावर कोसळून जागीच मत्यू झाला. मृत महिलेचे नाव कुमरजी पुनाजी कास्देकर (४० रा. भार, जि. बैतुल) असे आहे. ही महिला नंदू लोहिया यांच्या शेतात कामासाठी गेली असताना अचानक वीज पडून तिचा मृत्यू झाला. तिची मुलगी बबली पूनाजी कास्देकर ही सुध्दा भाजली. कापणीला आलेल्या गहू व हरभरा पिकांनाही पावसाचा तडाखा बसला. दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्याजवळ सहा ते सात झाडे वादळामुळे उन्मळून पडली. येवदा येथेही वादळी पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे तालुक्यात वादळी पावसाचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगमन झाले. वादळामुळे तालुक्यात मोठी हानी झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका रबी पिकांना बसला.उमरी येथे दोघांचा मृत्यू दर्यापूर तालुक्यातील उमरी ममदाबाद येथे वीज पडून एका महिलेसह दहावीत शिकणाऱ्या गौरव सुधाकर हंबर्डे याचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. पाऊ स येत असताना तो शेंगा काढण्यासाठी घरावर चढला होता.तळेगावात तासभर वादळ धामणगावरेल्वे तालुक्यातील तळेगावदशासर, ढाकुलगाव येथे बोराच्या आकाराची गार पडली. तब्बल तासभर वादळ चालले. वादळामुळे घरावरील टिनपत्रे उडाली.हरभऱ्याच्या गंज्या उडाल्याभातकुली, गणोरी, टाकरखेडा संभू, आष्टी, कामनापूर, देवरी, मक्रमपूर, मार्की, साऊर, कळमगव्हाण, जळका हिरापूर, लसनापूर येथे शेतात सवंगून ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंज्या वादळामुळे उडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.काळोखात बुडाली गावेवादळाच्या तडाख्यामुळे मार्गावरील झाडे खाली कोसळल्याने विद्युत तारा तुटल्याने काळोख पसरला आहे. मेळघाटातील गावेही अंधारात होती.मृगबहराची संत्री गळालीशेतकऱ्यांचे रोख रकमेचे पीक असणाऱ्या संत्र्याच्या मृग बहाराची संत्री वादळामुळे खाली आली. यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला. कारण यंदा संत्राउत्पादक शेतकऱ्यांची भिस्त मृग बहारावर होती. परंतु निसर्गाने मारल्यामुळे शेतकरी आता कोलमडला आहे. मदतीची नितांत गरज आहे.शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिकादोन आठवड्यानंतर पुन्हा वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला. सर्वाधिक नुकसान गहू व संत्रा पिकाचे झाले. जिल्ह्यात सर्वत्र ऊं बीवर आलेला गहू झोपला.