शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंतापदी पदस्थापना रोखली, शासनाला लाखोंचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागातील १४१ कनिष्ठ अभियंता तसेच ५१ सहायक अभियंता श्रेणी-२ यांना उपविभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती ...

अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागातील १४१ कनिष्ठ अभियंता तसेच ५१ सहायक अभियंता श्रेणी-२ यांना उपविभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती मिळाली असली तरी पदस्थापना न मिळालेली नाही. याच पदाच्या प्रभाराकरिता शासनाकडून त्यांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत. याकरिता चार महिन्यांतच साडेअकरा लाखांचा भुर्दंड शासनाला बसला आहे.

कनिष्ठ अभियंता पदावरून २०१९-२० च्या निवडसूचीतील १०१ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना महारा

ष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ मधील उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती, तर ४० जणांना याच पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. ५१ सहायक अभियंता श्रेणी-२ यांनाही याच पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी हा आदेश निर्गमित झाला. या निवडसूचीतील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत. ही व्यक्ती आरक्षणाचा लाभ मिळालेली नसावीत, अशा सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना आहेत. दरम्यान, प्रकरण न्यायालयात गेल्याने संपूर्ण निवडसूचीतील पदोन्नती शासनाने रोखली. त्यामुळे १९२ जणांना अतिरिक्त प्रभाराकरिता दरमहा १५०० रुपये याप्रमाणे २ लाख ८८ हजार रुपये खर्च होतात. पदोन्नतीचा शासननिर्णय निर्गमित झाल्यापासून अर्थात १२ नोव्हेंबर २०२० पासून शासनाने या पदोन्नत कनिष्ठ अभियंत्यांना ११ लाख ५२ हजार रुपये प्रदान केले आहेत. वर्षभरातील ही रक्कम ३४ लाख ५६ हजार रुपये होणार आहे.

----------

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत येऊन ठेपली निवृत्ती

पदोन्नत झालेल्या अनेक कनिष्ठ अभियंत्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यापूर्वी पदस्थापना मिळाल्यास सन्मानाने निवृत्त होता येईल, अशी भावना त्यांच्यात प्रबळ आहे. विशेष म्हणजे, ऐन निवृत्तीच्या दिवशी काही जणांना पदस्थापना मिळाली आहे. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

-----------एवढी रक्कम शासनाने आपल्या पदरातून देण्याऐवजी सरळ पदस्थापना देऊन टाकावी. दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू झालेली असल्याने पदोन्नती मंजूर केली तरी त्यात शासनाचे नुकसान नाही, झालाच तर कर्मचाऱ्यांचा तोटा आहे. उपविभागाच्या मुख्यालयी नेमणूक मिळाल्यास घरभाडे भत्त्यांची कपात होईल. याबाबत तातडीने पावले उचलली जावीत.

- एस.जी. लाचुरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती