शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

राज्यात वाघांचे लोकेशन मोबाईलवर, जंगलात अत्याधुनिक कॅमेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 17:30 IST

व्याघ्र प्रकल्प आणि जंगलात वाघांच्या हालचाली, संरक्षणासाठी ट्रॅपिंग कॅमे-याने मॉनेटरिंग केले जात होते.

- गणेश वासनिक अमरावती : व्याघ्र प्रकल्प आणि जंगलात वाघांच्या हालचाली, संरक्षणासाठी ट्रॅपिंग कॅमे-याने मॉनेटरिंग केले जात होते. मात्र, आता विदेशी बनावटीचे अत्याधुनिक कॅमेरे जंगलात बसवून वाघांचे लोकेशन थेट वनरक्षकांना स्वत:च्या मोबाईलवर बघता येणार आहे. राज्याच्या वनविभागात प्रायोगिक तत्त्वावर ४० अत्याधुनिक कॅमेरे खरेदी करण्यात आले आहे. चार वर्षांपासून राज्यात वाघांची शिकार आणि नैसर्गिक मृत्यूमुळे वनविभाग हतबल झाला आहे. व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभागाच्या जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढीस लागल्याने वाघांचे ‘डे टू डे मॉनेटरिंग’ करण्यासाठी वनविभागाने आधुनिक उपकरणांचा संरक्षणासाठी उपयोग करणे सुरू केले आहे. इम्प्रेशन पॅड, ट्रान्झॅक्ट लाईन या पारंपरिक वाघ संरक्षणाच्या पद्धतीमागे सोडून वनविभागाने जीपीएस ट्रॅकिंग, कॅमेरा ट्रॅपिंग, कॉलर आयडी आणि स्थानिक पातळीवर नवनवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.मध्यंतरी वाघांचे मॉनेटरिंग सेन्सर कॅमेराद्वारे जात असतानाच आता अमेरिकन बनावटीचे महागडे अत्याधुनिक कॅमेरे वनविभागाने काही प्रमाणात खरेदी केले आहे. जवळपास हे ४० कॅमेरे आहेत. वनकर्मचा-यांना थेट वाघांची जंगलातील भ्रमंती त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवर क्षणोक्षणी घेता येणार आहे. जंगलात लावण्यात येणा-या अशा कॅमे-यात जीपीएस प्रणालीशी संलग्न करण्यात आले असून, त्याकरिता नवीन सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे. हे सॉफ्टवेअर ठराविक वनाधिकाºयांच्या मोबाईलशी जोडलेले जाईल. जेणेकरून त्या अधिका-यास त्यांच्या वनक्षेत्रात असलेल्या वाघांचे दैनंदिन लोकेशन मोबाईलच्या माध्यमातून घेता येणार आहे. 

कनेक्टिव्हिटीमुळे फेल ठरण्याची भीतीवाघांचे लोकेशन आतापर्यंत जीपीएस व कॉलर आयडीमुळे घेण्यासाठी कार्यालयीन संगणकांचा वापर केला जायचा. मात्र, विदेशी बनावटीच्या या कॅमे-यामुळे विकसित सॉफ्टवेअर ०१ च्या माध्यमातून पठाराच्या किंवा टेकडी नसलेल्या जंगलातील वाघांचे लोकेशन मोबाईलमध्ये सहज घेता येणार आहे. हा प्रयोग यवतमाळ, चंद्रपूर, उमरेड, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात केला जात आहे. मात्र, मोबाईल नेट कनेक्टिव्हिटी असल्यास वाघांचे दैनंदिन लोकेशन कर्मचाºयांना मोबाईलमध्ये पाहता येईल. कनेक्टिव्हिटी नसल्यास हे महागडे कॅमेरे फेल ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. 

इतर राज्यांनी केले अनुकरणमहाराष्ट्र वनविभाग वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी नवनवीन तंत्रज्ञान उपाययोजना आखत असल्याने गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगना, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंडसारखे राज्य वाघांच्या संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्राकडून घेत असलेल्या उपाययोजनेचे धडे घेत आहे. व्याघ्र संवर्धनात सध्यातरी मध्यप्रदेश अव्वलस्थानी आहे. अत्याधुनिक कॅमे-यांमुळे वाघांच्या संरक्षणासाठी बळकटी मिळणार आहे. 

राळेगाव तालुक्यात चार कॅमेरेवनविकास महामंडळाच्या अखत्यारित येणा-या राळेगाव तालुक्यात एका नरभक्षक वाघिनीने आतापर्यंत १४ लोकांचे बळी घेतले आहे. मात्र, अद्यापसुद्धा या वाघिनीचा शोध वनविकास महामंडळाच्या अधिका-यांना लागलेला नाही. या वाघिनीला जेरबंद करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना मोबाईलवर वाघांचे लोकेशन देणारे कॅमेरे राळेगाव तालुक्यातील संवेदनशील जंगलात बसविले असून, सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

जंगलात वाघांचे संरक्षण व सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. प्रायोगिक तत्त्वावर अत्याधुनिक ४० कॅमेरे खरेदी केले असून, ते संवेदनशील भागात बसविले आहेत. नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे कॅमेरे वनकर्मचा-यांच्या मोबाईलशी जोडले जातील. त्यामुळे वाघांचे लोकेशन वनकर्मचा-यांना सहजतेने मिळण्यास मदत होईल.   - सुनील लिमये,  अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) महाराष्ट्र