शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डीपीआर सर्वेक्षणाला प्रारंभ

By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST

शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करून शहर विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याला प्रारंभ झाला आहे.

२० वर्षांचा वेध घेणार : डिजिटायझेशन मॅपिंग, सर्वेक्षण सुरूअमरावती : शहराची वाढती लोकसंख्या, मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, वाहतूक आदी बाबींचा समावेश करून शहर विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याला प्रारंभ झाला आहे. पुढील २० वर्षांचा वेध घेत नागरिकांच्या समस्या, प्रश्नांना यात प्राधान्य दिले जात असून मौजे प्रगणनेनुसार सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. एकूणच शहराचे डिजिटायझेशन मॅपींग केले जाणार आहे.नगर विकास विभागाने मान्यता दिल्यानुसार १९९२ नंतर आता २०१५ मध्ये अमरावती शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. महापालिका हद्दीतील नागरी वस्त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात अमरावती, बडनेरा शहरासह १७ समाविष्ट खेड्यांचेही सर्वेक्षण केले जाणार असून मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण आणि डिजीटायलेझन मॅपिंगची जबाबदारी पुणे येथील मोनार्च सर्वेअर इंजिनियरिंग प्रा. लि. कडे सोपविण्यात आली आहे. या कंपनीने मौजे शेगाव भागातून सर्वेक्षणाचे कामदेखील सुरु केले आहे. नवीन, जुन्या नागरी वस्त्यांची वस्तुस्थिती सर्वेक्षणात नमूद केली जाणार आहे. सद्याची लोकसंख्या आणि येत्या २० वर्षांनंतर शहराचे रुपडे कसे राहील, ही बाब डीपीआरमध्ये समाविष्ट केली जात आहे. एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विद्यमान जमिनीचा वापर नकाशा तयार करुन तो नगररचना विभागाच्या चमूकडून मंजूर करून घेतला जाणार आहे. शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी राज्य शासनाने नाशिक येथील नगर रचना विभागाची विशेष चमू अमरावतीत पाठविली आहे.या चमुचे कामकाजही सुरु झाले आहे. मात्र, डीपीआरचे सर्वेक्षण आणि डिजिटायझेशनचे मॅपिंगचा कालावधी प्रशासनाने मोनार्च कंपनीला १० महिने ठरवून दिला आहे. खरे तर शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी २०१२ मध्ये सर्वेक्षण करून तो शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे आवश्यक होते, तथापि महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईने तीन वर्षे तो उशिरा तयार केला जात आहे. डीपीआरमध्ये नागरी वस्त्या, मूलभूत व पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. (प्रतिनिधी)२० मौजे प्रगणनेचे होणार सर्वेक्षणअमरावती, बडनेरा शहरासह महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या १७ खेड्यांचे विकास आराखडा तयार करताना २० मौजे प्रगणनेचे सर्वेक्षण होणार आहे. यात पहिला टप्पा मौजे शेगाव येथून सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आले आहे. घरांचे मोजमाप, ले-आऊट, जमिनीचा वापर, लोकसंख्येनुसार सर्वेक्षण केले जात आहे. डिजीटायलझेन मॅपिंग करुन तो डाटा जीआयएस प्रणालीशी लिंकद्वारे जोडला जाणार आहे. या मूलभूत बाबींचा राहील समावेशशहर विकास आराखड्यात येत्या २० वर्षांचे व्हिजन लक्ष्य ठेवून मूलभूत बाबींना स्थान दिले जात आहे. यात शाळा, महाविद्यालये, रस्ते, उद्यान, हॉस्पिटल, रुग्णालये, संकुल, क्रीडांगणे, मॉल्स, समाजमंदिर, अंगणवाडी केंद्र, बसस्थानक, चौक सौदर्र्यींकरण, वाहतूक व्यवस्था, भाजीबाजार, हॉकर्स झोन, डिपी रस्ते, ले- आऊट, प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, रस्ते फुटपाथ, वाहनतळ आदी बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे.एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार विकास आराखडा तयार केला जात आहे. यात विद्यमान जमिनीचा वापर गृहीत धरुन सर्वेक्षण केले जात आहे. मौजे प्रगणनेनुसार हे सर्वेक्षण होत असून नागरी प्रश्न, मूलभूत सोईसुविधांना प्राधान्य राहील.- सुरेंद्र कांबळेसहसंचालक नगर रचना विभाग, महापालिका