शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

एसटी फेऱ्या वाढणार: आठवडाभरात १५०० संपकरी कामावर परतले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते.  त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या  आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात येत आहे. उच्च न्यायालयाने येत्या २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये आतापर्यंत  १ हजार ६००  कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत; परिणामी लालपरी पूर्वपदावर येत आहे.
एसटीच्या अमरावती विभागातील अनेक कर्मचारी गत पाच महिन्यांपासून संपावर होते.  त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित झाली होती. आता हळूहळू कर्मचारी कामावर परत येत आहेत. 
जिल्ह्यातील एकूण ८ आगारामधील एकंदरीत ३७७ बसगाड्यांपैकी २१५ बस आता रस्त्यावर धावू लागल्या  आहेत. सर्वच प्रमुख शहरांसाठी बसगाड्या उपलब्ध झाल्या आहेत तथापी अजूनही ग्रामीण भागात लालपरी धावत नसल्याने गावकऱ्यांची अडचण कायम आहे.

४०० चालक ५०० वाहक परतले
 जिल्ह्यातील ८ आगारातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ४०० चालक,५०० वाहक आणि ७०० यांत्रिकी व प्रशासकीय कर्मचारी कामावर परतले आहे. 
 अजूनही बरेच कर्मचारी कामावर रुजू झालेले नसले तरी २२ एप्रिलपर्यंत बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर परतण्याची शक्यता आहे.
 एसटी महामंडळाच्या सर्व बस फेऱ्या सुरू होऊन येत्या आठवडाभरात लालपरी पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.

२२ एप्रिलची डेडलाईन

- संपकरी कर्मचाऱ्यांना २२ पर्यंत कामावर  हजार व्हावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. परत येणाऱ्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशात नमूद आहे. 
- बडतर्फ कर्मचाऱ्यांना अपील सादर करून सुनावणी झाल्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.
- २२ नंतरही रुजू न होणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही.

एसटीच्या फेऱ्या वाढणार

- संपातील कर्मचारी हळूहळू कामावर परत येत असल्यामुळे सर्व आगारातील  अनेक बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. 
- उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर एसटीच्या फेऱ्या वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप