धम्माल दांडिया स्पर्धेसाठी बक्षिसांची लूट

By Admin | Updated: October 29, 2015 00:38 IST2015-10-29T00:38:52+5:302015-10-29T00:38:52+5:30

‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने आंतरराज्यीय धम्माल दांडिया समूह नृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.

The spoils of prizes for Dharmal Dandiya | धम्माल दांडिया स्पर्धेसाठी बक्षिसांची लूट

धम्माल दांडिया स्पर्धेसाठी बक्षिसांची लूट

अमरावती : ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने आंतरराज्यीय धम्माल दांडिया समूह नृत्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
प्राथमिक फेरीतील विजेत्यासाठी पहिले बक्षीस ५००१ रूपये, द्वितीय बक्षीस ३००१ रूपये व तृतीय बक्षीस २००१ रूपये तर अंतिम फेरीतील प्रथम बक्षीस ५१००१, द्वितीय बक्षीस ३१००१, तर २१००१ रूपयांचे तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता ५०० रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटात किमान १२ ते १६ स्पर्धकांचा एक संघ असवा. लहान मुलांची गरज भासल्यास १५ वर्षांखालील दोन लहान मुले सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय १५ वर्षांच्यावर असावे. गटामध्ये स्त्री-पुरूष दोघांचाही समावेश करता येईल. स्पर्धकांना गाण्याची सीडी सोबत आणावी लागेल. ढोल व संदलचा उपयोगही स्पर्धेदरम्यान करता येईल. प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा अवधी मिळेल. तांत्रिक अडचणींसाठी सखी मंच जबाबदार राहणार नाही. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: The spoils of prizes for Dharmal Dandiya