शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

६.८८ लाखमधील अपात्र रेशनकार्डची खास शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:34 IST

गजानन मोहोड अमरावती : अपात्र शिधापत्रिकाद्वारे स्वस्त दरात रेशनचा लाभ घेणे आता महागात पडणार आहे. अशा रेशनकार्डचा शोध ...

गजानन मोहोड

अमरावती : अपात्र शिधापत्रिकाद्वारे स्वस्त दरात रेशनचा लाभ घेणे आता महागात पडणार आहे. अशा रेशनकार्डचा शोध घेण्यासाठी १ फेब्रुवारीपासून खास तपासणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. यासंदर्भातील पुरावा संशयास्पद वाटल्यास पोलिसांकडूनही तपासणी होणार असल्याने बनावट रेशनकार्डधारकांचे धाबे दणाणले आहे.

सध्या बीपीएल, अंत्योदय, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्डाद्वारे रेशनची उचल करणा-या शिधापत्रिकांसाठी ही खास शोधमोहीम राहणार आहे. यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकेची तपासणी केल्या जाणार आहे. यासाठी त्या-त्या विभागातील दुकानातून शासकीय कर्मचारी किंवा तलाठी यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुुना फार्म वाटप करणार आहेत व त्या दुकानास जोडलेल्या रेशनकार्डधारकांकडून फार्म स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात येणार आहे. अर्जामध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व जुने कागदपत्रे जोडून घेऊन सर्व अर्ज यादीसह संबंधित कर्मचा-यांद्वारा क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करण्यात येईल व ही प्रक्रिया एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

अर्ज व कागदपत्राची तपासणी पुरवठा विभागाचा क्षेत्रीय विभाग करणार आहे. यानंतर पुरावा असणारे व नसणारे याची स्वतंत्र यादी तयार करण्यात येईल. पुराव ज्यांनी जोडला आहे त्यांचे कार्ड वैध ठरवून त्यांना रेशन पुरवठा पूर्ववत करणार आहे व ज्यांच्याजवळ पुरावा नाही त्यांचे रेशनकार्ड निलंबित करणार येऊन संबंधित दुकानदारास देण्यात येणा-या नियतनात कपात करण्यात येईल. ही प्रक्रिया एक महिन्याच्या आत करण्यात येणार आहे.

पाइंटर

रेशनकार्डची जिल्हास्थिती

* बीपीएल - १,७२,७६१

* अंत्योदय - १,२२,०२०

* केशरी - १,२२,७४०

* शेतकरी- १,२६,७७५

* केशरी १,१८,१४८

* अन्नपूर्णा- निरंक

* शुभ्र -२५,६११

* एकूण ६,८७,९५५

बॉक्स

हे पुरावे आवश्यक

रेशनकार्डधारक त्याच भागात राहत असल्याबाबतची खात्री देण्याकरीता भाडेपावती, निवासस्थानाचे मालकीबाबतचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलीफोन, मोबाइल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, आदी पुरावे देता येतील. मात्र, हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा.

बॉक्स

निलंबित शिधापत्रिकाधारकांना १५ दिवसांची मुदत

ज्यांच्या शिधापत्रिका निलंबित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना आणखी १५ दिवसांची मुदत मिळेल व ते त्या भागात राहत असल्याचा पुरावा त्यांना १५ दिवसात द्यावा लागणार आहे. आवश्यकतेनुसार ही मुुदतवाढ राहील. त्यानंतरही पुरावा न आल्यास रेशनकार्ड रद्द केल्या जाईल, ही प्रक्रिया एक महिन्यात करण्यात येणार आहे.

बॉक्स

एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड तत्काळ रद्द

रेशनकार्डची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय, खासगी कंपनीतील कर्मचा-याचे ज्ञात उत्पन्न १ लाखावर असल्यास अशा कर्मचा-यांच्या शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्याचे आदेश आहेत व त्यांच्या मागणीनुसार अनुज्ञेय शिधापत्रिका मात्र मिळू शकेल. याशिवाय एक कुटुंबात किंवा एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका मिळणार नाही व दुबार, अस्तित्वात नसलेली व स्थलांतरित व्यक्ती तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्यात येणार आहे.

बॉक्स

चुकीचे शिधापत्रिका वितरित झाल्यास अधिका-यावर कारवाई

शिधापत्रिका जर चुकीच्या पद्धतीने वितरित केली गेली असल्यास त्या शासकीय अधिका-यावर कारवाई केली जाणार आहे. पुुरावा संशयास्पद वाटत असल्यास पोलीस विभागाकडून तपासणी केल्या जाणार आहे. एकाच कुटुंबात दोन विभक्त कुटुंबाला शिधापत्रिका देताना दोन्ही अंत्योदय किंवा बीपीएल असणार नाही, याची खबरदारी घेतल्या जाणार आहे.