जादा भावाने बियाणे विकले अन् परवानाच गमावून बसले

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 28, 2023 05:04 PM2023-06-28T17:04:03+5:302023-06-28T17:04:20+5:30

एसएओ यांचे आदेश : समाज माध्यमावरील कपाशी बियाणे विक्रीचा व्हीडीओ भोवला

sold seeds in more price and lost his license, Govt cancelled in Amravati | जादा भावाने बियाणे विकले अन् परवानाच गमावून बसले

जादा भावाने बियाणे विकले अन् परवानाच गमावून बसले

googlenewsNext

अमरावती : विविध नियमांचे उल्लंघन व कपाशी बियाण्यांची जादा भावाने विक्रीबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला व्हीडीओ, याबाबत जुन्या कॉटन मार्केट जवळील प्रसाद एजन्सीच्या संचालकांची मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये नियमातील तरतुदीचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्याने या विक्री केंद्रांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश एसएओ राहूल सातपूते यांनी बुधवारी दिले.

 २४ जून रोजी याच केंद्रातून जादा दराने कपाशी बियाणे विक्रीचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता, त्याची गंभीर दखल एसएओ यांनी घेतली व या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये विविध नियमांचे उल्लंघन व बियाणे नियंत्रण आदेश १९८३ मधील तरतुदीचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्याने या केंद्रांचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करण्यात आला आहे.

Web Title: sold seeds in more price and lost his license, Govt cancelled in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस