शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी तालुक्यात हिरव्या झाडांची कत्तल

By admin | Updated: October 15, 2015 00:21 IST

स्थानिक पाट नदीच्या काठावरील वृक्षांची दिवसा ढवळया राजरोसपणे कत्तल करण्यात आली.

चौकशी सुरु : पाट नदीकाठावरील प्रकार मोर्शी : स्थानिक पाट नदीच्या काठावरील वृक्षांची दिवसा ढवळया राजरोसपणे कत्तल करण्यात आली. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.मनिमपूर ते भीवकुंडी हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बनविला जात आहे. सध्या या रस्त्याची आखणी झालेली आहे. रस्त्याच्या बाजूने पाट नावाची नदी वाहते. रस्त्याच्या आखणीत वृक्षांचा अडथळा येत नसूनही चक्क नदीच्या काठावरील मोठमोठया हिरव्याकंच झाडांची कत्तल केली गेली. ही माहिती एका जागरूक नागरिकाने व्हॉट्स अ‍ॅपवर कत्तलीचे छायाचित्र पाठवून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने तलाठयाला घटनास्थळी पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत घटनास्थळावरून कापलेली झाडे हलवू नयेत, असेही त्यांनी बजावले. दरम्यान मनिमपूर-भीवकुंडी रस्ता निर्मितीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या मते झाडांची कत्तल ही वरुड तालुक्यातील लाकूड तस्कराने केली आहे. रस्ता निर्मितीत अडथळा ठरत नसूही या हिरव्यागार झाडांची कत्तल का झाली? हा खरा प्रश्न आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून करुन या झाडांची कत्तल करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनासाठी युध्दस्तरावर योजना राबवित आहे. मात्र, दुसरीकडे हिरव्यागार वृक्षांची कत्तल बेधडकपणे केली जात आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून चौकशी अहवालाकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)एकीकडे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविल्या जात असतानाच दुसरीकडे झाडांची अवैधरीत्या कत्तल केली जात आहे. ही गंभीर बाब असून या प्रकरणी आपण तलाठ्याकडून अहवाल मागविला असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांविरुध्द कठोर कारवाई केल्या जाईल. - ललितकुमार वऱ्हाडे उपविभागीय अधिकारी