शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मेळघाटातील ‘ती’ सहा गावे प्रकाशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:00 AM

तालुक्यातील रंगूबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार या गावांत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर अंधाराचे साम्राज्य कायम आहे. प्रजासकाकाची ७० वर्षे पूर्ण करणाºया या देशातील धारणी तालुक्यात रात्रीचा काळोख हीच आदिवासींची ओळख ठरली आहे. मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो १९९३ मधील कुपोषणाचा उद्रेक. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमातून उघड झाल्यानंतर शासनाने मेळघाटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देस्वातंत्र्याची ७३ वर्षे : ना वीजजोडणी, ना अन्य सुविधा; प्रशासनाकडून निवेदने बेदखल

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : सातपुड्याच्या कुशीत आणि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी जनता अद्यापही विकासाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज, रस्ते, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. धारणी तालुक्यातील सहा गावे त्याची ज्वलंत उदाहरण ठरली आहेत.तालुक्यातील रंगूबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार या गावांत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर अंधाराचे साम्राज्य कायम आहे. प्रजासकाकाची ७० वर्षे पूर्ण करणाºया या देशातील धारणी तालुक्यात रात्रीचा काळोख हीच आदिवासींची ओळख ठरली आहे.मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो १९९३ मधील कुपोषणाचा उद्रेक. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमातून उघड झाल्यानंतर शासनाने मेळघाटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मेळघाटातील अठराविश्वे दारिद्र्य भोगणाºया आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कुपोषणाचा नावाखाली दरवर्षी विविध विभागांमार्फत कोट्यवधीचा निधी येतो. मध्य प्रदेशातून वीजपुरवठा घेण्याच्या वल्गना केल्या जातात. मात्र, योजनांची अंमलबजावणी नीटशी होत नसल्याने व शासकीय योजनांच्या पाचवीला भ्रष्टाचार पुजला असल्याने आदिवासी खोल गर्तेत अडकला आहे.दैनंदिन गरजेच्या प्रकारात मोडणाºया वीजपुरवठ्याची स्थितीदेखील तशीच आहे. रंगुबेली, खामदा, ढोकळा, कुंड, खोपमार या सहा गावांमध्ये विजेचे खांब पोहोचले नाहीत. त्यामुळे गावात ना मोबाईल, ना वीजेवर चालणारी कुठली उपकरणे. स्वातंत्र्यापूर्वीची खेडीे कशी असावीत, हे या सहा गावांमध्ये भटकंती केल्यास कळू शकेल. गावात पोहोचण्यासाठी रस्तासुद्धा नाही. या सहा गावांमध्ये पोहोचणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. दुचाकीचा प्रवास मोठ्या मुश्किलीने केला जाऊ शकतो, अशी या गावांची अवस्था आहे. याव्यतिरिक्त गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी हे पाणीपुरवठा योजनेअभावी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ही गावे मेळघाटातील आहेत का आणि मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात येते का, असा सवाल विचारला जात आहे. आपल्या खेड्याची परिस्थिती सुधारेल, या आशेवर या सहा गावांतील अनेक पिढ्या जगत राहिल्या. त्यामुळे हे एक स्वप्नच राहील का, असा प्रश्न येथील आदिवासींना सतावत आहे.धारणी तालुक्यातील या सहा गावांव्यतिरिक्त धारणी महावितरण उपविभाग अंतर्गत येणारे चिखलदरा तालुक्यातील रक्षा हे गावसुद्धा विजेविना आहे. महावितरणने आदेश दिल्यास, योजनांना मान्यता मिळाल्यास या गावांना वीजपुरवठा करणे शक्य आहे.-विनय तायडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज