शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

तीन आरपीएफ शिपायांसह सहा संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 5:00 AM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा रविवारी प्राप्त ८० अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये बुधवारा दहिसात परिसरात संक्रमित एका पोलीस कर्मचाºयाचे ५८ वर्षीय वडिलांचा समावेश आहे. अंबागेट येथील ३४ वर्षीय तरुण हा वाहनाचे शोरुममध्ये काम करतो व हबीबनगर येथे ४५ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

ठळक मुद्दे‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील अन् एक होमगार्डही कोरोनाग्रस्त

अमरावती/बडनेरा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी सकाळी आणखी सहा अहवाल पॅझिटिव्ह आलेत. यामध्ये रेल्वे पोलीस दलाच्या तीन शिपायांसह शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या पोलीस शिपायांचे वडील व एक होमगार्ड व अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१८ वर पोहोचली आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा रविवारी प्राप्त ८० अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये बुधवारा दहिसात परिसरात संक्रमित एका पोलीस कर्मचाºयाचे ५८ वर्षीय वडिलांचा समावेश आहे. अंबागेट येथील ३४ वर्षीय तरुण हा वाहनाचे शोरुममध्ये काम करतो व हबीबनगर येथे ४५ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. याव्यतिरीक्त अन्य तीन हे रेल्वे पोलीस दलाचे शिपायी आहेत. ते श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये गस्तीवर होते. यांच्याच सोबतीला असणाºया आठ जवानांचे थ्रोट स्वॅबदेखील तपासणीसाठी घेण्यात आले होते. बारा बटालियन ठाकुर्ली मुंबईचे जवान ५ मे पासून आरपीएफ मुख्य कार्यालय नागपूर येथून श्रमिक ट्रेनच्या स्काटींगसाठी कार्यरत आहे. नागपूर ते बडनेरापर्यंत व काही वेळ आराम करून पुन्हा बडनेरा ते नागपूर, अशी गस्त या जवानांची होती. यातील तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.बडनेरा रेल्वे स्थानकाच्या विश्रामगृहात काही दिवस थांबल्यानंतर या सर्वांना नव्यावस्तीच्या आरपीएफ कॉलनीतील क्वॉर्टर्स विश्राम करण्यासाठी देण्यात आले. या प्लाटूनमधील एक जवान नागपूरात पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातून या तिघांना लागण झाली की रेल्वे प्रवाशांमुळे हे आता तपासल्या जात आहे. बडनेºयाच्या आरपीएफ कार्यालयाशी यांचा संपर्क आला का, हेदेखील प्रशासनाला तपासणे गरजेचे आहे. आरपीएफ कॉलनी, रेल्वेस्थानक परिसर सॅनिटाईझ करण्यात आला.तीन रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’सद्यस्थितीत हॉटस्पॉट असलेल्या मसानगंज भागातील ५० वर्षीय महिलेसह भातकुली येथील ५० वर्षीय पुरुष व लालखडी येथील १९ वर्षीय युवकाला रविवारी दुपारी कोरोनामुक्त करण्यात आले, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. या रुग्णांवर पहिले पाच दिवस औषधींचा कोर्स देण्यात आला. त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवण्यात आले. या व्यक्तींमध्ये कुठलीही लक्षणे न दिसल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले व त्यांना मिठाई देण्यात आली. या व्यक्ती आत सात दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत. जिल्ह्यात १२० व्यक्तींना कोरोनामुक्त करण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या