शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

साहेब, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 16:24 IST

Amravati : तहसील कार्यालयात नागरिकांना दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेल्या कार्यालयात शासकीय दाखले, मालमत्तेची खरेदी-विक्री, शालेय दाखले, शेतशिवाराच्या भानगडी अशा एक ना अनेक कामकाजासाठी शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येरझारा घालतात. परंतु, येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथील वॉटर कूलरमधून जंतुजन्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

या जंतुसंसर्गित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याची तहसील प्रशासनाला पुसटशीही कल्पना नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाची ही अनभिज्ञता सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासकीय कामकाजानिमित्त येणाऱ्या गोरगरीब आबालवृद्धांना पिण्यासाठी येथे वॉटर कूलर लावण्यात आले आहे. परंतु, ज्या टाकीतून वॉटर कूलरला पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, त्या पाण्याच्या टाक्या झाकणविरहित असून, त्यामध्ये तुडुंब जलचर वनस्पती तथा जीवजंतू साचले आहे. तहसील कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित झाले तेव्हापासून त्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली नसून, याबाबत तहसील प्रशासनाने कधी गांभीर्यच दाखविले नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भऊ शकते.

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था तहसील कार्यालयात असलेल्या स्वच्छतागृहांपैकी अर्धेअधिक कुलूपबंद आहेत, तर वापरातील स्वच्छतागृहांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याची दुर्गंधी तहसील कार्यालयाच्या आवारात पसरते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र वॉटर कॅनविशेष म्हणजे, येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी कधीच वॉटर कूलरचे पाणी पित नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक दालनात शुद्ध वॉटर कॅनची सोय आहे.

'लोकमत'ने शोधले वास्तवतहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिक पीत असलेले पाणी दूषित व जंतुजन्य असल्याचा संशय येताच लोकमतने पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तेव्हा शेवाळयुक्त व घाण साचलेल्या पाण्याच्या उघड्या टाक्या निदर्शनास आल्या.

पावसाळ्यात धोकापावसाळ्यात पाण्यात जंतुजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्वच्छ व उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मेंटेनन्स निधी जातो कुठे?स्थानिक कार्यालयातील नियमित नियोजनासाठी तहसील कार्यालयाला निधी प्राप्त होतो. हा निधी नेमका कुठे खर्च होतो, अशी विचारणा टाक्यांच्या स्थितीवरून केली जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती