आॅनलाईन लोकमतपरतवाडा : उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागली आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावशिवारासह रस्त्यावर दर्शन देत असल्याचे चित्र परतवाडा-चिखलदरा मार्गावर आहे.परतवाडा-धामणगाव गढी मार्गावरील मोथा गावानजीक दोन बिबटांचे दर्शन पर्यटकांसह स्थानिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. रात्री १० नंतर या बिबट्याची जोडी मोथा, आडनदी ओशो पॉइंटनजीक रस्त्यावर दिसली. त्यांचा व्हिडीओच नागरिकांनी मोबाइलमध्ये कैद केला आहे.बिबटांची संख्या वाढली, पाणवठे आटलेअस्वलांचा धुमाकूळ अंजनगावनजीक दहिगाव, धामणगाव गढी, मोथा, मडकी, परिसरात सुरू आहे. पवनऊर्जा प्रकल्पानजीक दररोज रात्री अस्वल, गावात शिरण्यासाठी येत असल्याने नागरिकांना तिला जंगलात पिटाळून लावावे लागत असल्याची माहिती मोथ्याचे माजी सरपंच साधुराम पाटील यांनी दिली. वन्यप्राण्यांची संख्या वाढली असताना वन किंवा व्याघ्र प्रकल्पाकडून त्यांच्या पाण्याची आणि खाद्यान्नाची व्यवस्थाच करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.
चिखलदरा मार्गावर बिबट्यांचे दर्शन; मोथा गावापर्यंत अस्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 21:59 IST
उन्हाळ्याची चाहूल लागताच वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागली आहेत.
चिखलदरा मार्गावर बिबट्यांचे दर्शन; मोथा गावापर्यंत अस्वल
ठळक मुद्देचाहूल उन्हाळ्याची : जंगलातील पाणवठे पडू लागले कोरडे