शिक्षण विभागात शुकशुकाट
By Admin | Updated: August 2, 2016 00:19 IST2016-08-02T00:19:25+5:302016-08-02T00:19:25+5:30
येथील भातकुली पंचायत समितीच्या आवारात असलेल्या जि.प. शिक्षण विभागात २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान तुरळक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

शिक्षण विभागात शुकशुकाट
दुर्दशा : घाणीचे साम्राज्य, प्रवेशद्वारालगत गटार , परिसराला जंगलाचे स्वरूप
मनीष कहाते अमरावती
येथील भातकुली पंचायत समितीच्या आवारात असलेल्या जि.प. शिक्षण विभागात २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ वाजतादरम्यान तुरळक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यालयातील टेबल, खुर्च्या व फाईलीच्या गठठयावर कचराच कचरा आढळून आला. परिसरातही सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न अभ्यांगतांना पडला आहे.
सुमारे एकरभराच्या परिसरात झेडपीचा शिक्षण विभागाचा डोलारा उभा आहे. कार्यालयात एका हॉल १८ टेबल आणि खुर्च्या अस्तित्त्वात आहेत. परंतु या टेबलावरचे संगणक लाईट व पंखे सुरू होते. परंतु कोणतेही कर्मचारी हजर नव्हते. व्हरांड्यात १०० च्या वर अभ्यागत कर्मचाऱ्यांची चातकासारखी हातात कागदपत्रे घेऊन कर्मचाऱ्यांची वाट पाहत होते. विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक दोघे कार्यालयात नव्हते. याचा त्रास मात्र दुरदुरुन येणाऱ्या अभ्यागतांना झाला.
संपूर्ण कार्यालयात फाईलींचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडलेले होते. अधिकाऱ्यांचे ‘टेबल व खुर्च्यांवर घाणीचे साम्राज्य होते. परिसरात सर्वत्र पाण्याचे डबके साचले होते. कार्यालयाच्या मुख्य दारासमोरच चिखल झाला होता. त्यामुळे प्रत्येकाला चिखलातून पाण्यातूनच पाय ठेवून कार्यालयात प्रवेश करावा लागत असल्याची विदारक स्थिती निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या समोरच्या चौकोणी भागात मोठमोठे गवत वाढलेले आहे. इमारतीवरचा रंगा पूर्णपणे उडालेला आहे. कार्यालयाला कोठेही शिक्षण विभागाच्या नावाचा फलक दिसत नाही. त्यामुळे हे कार्यालय आहे की मेळघाटचे जंगल? हे बाहेरुन येणाऱ्या अभ्यागतांना कळतच नाही. वाहन पार्किंगकरिता जागा नाही. त्यामुळे वाहने मनात येईल तिकडे उभी करण्यात येत आहेत.
परिसरात शिक्षण विभाग, भातकुली पंचायत समिती, कृषी विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग इत्यादी कार्यालये नाही आहेत. परंतु डांबराचा रस्ता दिसतच नही. जिकडे-तिकडे पाणीच पाणी आणि खड्डेच खड्डे दिसत आहेत.
दोन अधिकारी दौऱ्यावर होते. काही पदे रिक्त आहेत. रेकॉर्ड ठेवायला जागा नाही. कायमस्वरुपी जागेची मागणी केली आहे.
- सी. आर. राठोड,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक