शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ हॉटेलला देणार कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: August 4, 2014 23:29 IST

बडनेरा मार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये ओल्या पार्टीत अर्धनग्न अवस्थेत नाच करुन धुमाकूळ घालणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीसह दोन युवकांना राजापेठ पोलिसांनी अटक केली.

ओली पार्टी : सीपींनी विचारला डीसीपींना जाबअमरावती : बडनेरा मार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये ओल्या पार्टीत अर्धनग्न अवस्थेत नाच करुन धुमाकूळ घालणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीसह दोन युवकांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. स्थानिक नवाथे चौकातील या हॉटेलमध्ये रविवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणाची सखोल चौकशी करून हॉटेल चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी सांगितले. बडनेरा मार्गावरील या हॉटेलमध्ये ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त रविवारी काही महाविद्यालयीन युवक-युवतींनी ओल्या पार्टीचे आयोजन केले होते. मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांनी डीजेवर ताल धरला होता. अर्धनग्न अवस्थेत नाचही सुरू होता. याची माहिती शहरातील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच ते थेट हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासणारराजापेठ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक एम.के. मानकर, महिला पोलीस शिपाई उज्ज्वला तायडे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे कळताच तरूण-तरूणी सैरावैरा पळू लागले. दरम्यान पोलिसांना रंगोली पर्ल हॉटेल येथून पळताना स्वप्नील सुधाकर पाचपोर (रा. जवाहर नगर ) व सौरभ दिलीप इंगळे या दोन युवकांसह एका महाविद्यालयीन तरुणीला पकडले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक एम.के. मानकर यांनी दिली. हॉटेलमध्ये ‘रेव्ह पार्टी’ असे वृत्त सोमवारी काही वृत्तपत्रात प्रकाशित होताच पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. त्यांनी यासंदर्भात पोलीस उपायुक्त गावराने यांना जाब विचारला. हॉटेलमध्ये नेमके काय घडले?, हॉटेल मालकाने कशासाठी परवानगी घेतली?, डीजेच्या तालावर नृत्याची परवानगी नसताना हॉटेल मालकाने परवानगी कशी व का दिली? याचा तपास करुन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश मेकला यांनी पोलीस निरीक्षक गणेश अणे व विधी अधिकारी अनिल विश्वकर्मा यांना दिली. यामध्ये दोषी आढळल्यास पोलीस अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करुन हॉटेलचा परवाना का रद्द करण्यात येवू नये या आशयाची नोटीस हॉटेलच्या संचालकाला बजावण्यात येणार असल्याची माहीती पोलीस आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.