अमरावती पोलीस आयुक्तालयात गोळीबाराचा थरार; क्युआरटी जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 10:20 IST2026-03-26T10:20:00+5:302026-03-26T10:20:46+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

अमरावती पोलीस आयुक्तालयात गोळीबाराचा थरार; क्युआरटी जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
अमरावती: अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. आयुक्तालयात कार्यरत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या (QRT) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवनयात्रा संपवली. विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. भरदिवसा आणि थेट आयुक्तालयाच्या वास्तूत ही घटना घडल्याने सर्वत्र शांतता पसरली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कर्तव्यावर असताना विजय नागापुरे यांनी इतका टोकाचा निर्णय नेमका का घेतला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.