शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीसमोर बूट पॉलीस आंदोलन

By admin | Updated: May 14, 2014 02:00 IST

पोलीस विभागातील आजी माजी वैद्यकीय रजेतील मृत पोलीस कर्मचाऱ्यांसह दिवंगत पोलीस, होमगार्डस व पोलीस पाटील यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होऊन त्यांच्या परिवाराला आत्मसन्मान देण्यात यावा

अमरावती : पोलीस विभागातील आजी माजी वैद्यकीय रजेतील मृत पोलीस कर्मचार्‍यांसह दिवंगत पोलीस, होमगार्डस व पोलीस पाटील यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होऊन त्यांच्या परिवाराला आत्मसन्मान देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा कचेरीसमोर आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्यावतीने बूट पॉलीस अभियान राबवून शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान आंदोलन कर्त्यांंच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन नेण्यात आले आहे.

आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्या प्रमुख मागण्यांमध्ये पोलीस विभागातील आजी माजी वैद्यकीय रजेतील मृत पोलीस कर्मचार्‍यांसह दिवंगत पोलीस, होमगार्ड्स व पोलीस पाटील यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होऊन त्यांच्या परिवाराला आत्मसन्मान देण्यात यावा तसेच सेवानवृत्त पोलिसांना कुटुंब आरोग्य योजना लागू करावी या मागण्यांसाठी आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्या वतीने शासनाकडे लढा सुरू आहे. याच विषयावर लक्ष वेधण्यासाठी यापूर्वीही नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान गुहमंत्री आर. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र मागण्यांबाबत शासन स्तरावरून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वरील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आत्मसन्मान चेतना फाउंडेशनच्या विनयपूर्वक चरण पादुका सेवा (बूट पॉलीस करून अभिनव आंदोलनाने) शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यामार्फत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पाठविण्यात आले आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माधव कारेगावकर, उपाध्यक्ष सहदेव नेतनराव, सचिव युवराज कराळे, सल्लागार सुधाकर जवंजाळ, सुदाम गवई, संघटक त्र्यंबक कारेगावकर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)