शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जिल्ह्यात ३८३ बालकांचा मृत्यू, २६ माताही दगावल्या; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:17 IST

शासकीय रुग्णालयांतील आकडेवारी...

अमरावती : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधून समोर आलेली बालमृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ३८३ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर २६ माताही दगावल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या गर्भवती माता, नवजात व बालरुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, उपचारादरम्यान होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. बालमृत्यूंसोबतच मातामृत्यूंचे प्रमाणही लक्षवेधी आहे. प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या गुंतागुंती, उशिरा रुग्णालयात दाखल होणे तसेच आवश्यक तज्ज्ञांची कमतरता ही मातामृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची मर्यादा आणि वेळेवर उपचार न मिळणे हीदेखील गंभीर बाब ठरत आहे. नवजात बालकांमध्ये कमी वजन, अकाली जन्म, संसर्गजन्य आजार आणि कुपोषण ही मृत्यूमागील प्रमुख कारणे आहेत. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक ५६ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यामुळे माता व बालरुग्णांसाठी विशेष निगा, अत्याधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

डफरीन रुग्णालयात सर्वाधिक २५१ बालकांचा मृत्यू -जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वाधिक २५१ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी रुग्णालयातील पाच वर्षातील सर्वाधिक बालमृत्यूची आहे. २०२१-२२ मध्ये १९८ बालमृत्यू, २०२२-२३ मध्ये २०५, २०२३-२४ मध्ये २२४ आणि २०२४-२५ मध्ये १८६ बालमृत्यूची नोंद आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून महिला प्रसूतीसाठी येत असल्याने मृत्यूची संख्या देखील अधिक आहे.

इर्विन रुग्णालयात सर्वाधिक माता मृत्यू -जिल्ह्यात वर्षभरात शासकीय रुग्णालयात २६ मातांचे मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ११ माता या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन)मध्ये दगावल्या आहेत. त्याचबरोबर डफरीनमध्ये ५ माता, धारणी उपजिल्हा रुग्णालयात २, अचलपूर जिल्हा स्त्री रुग्णालय २, तर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये ६ मातांच्या मृत्यूची नोंद आहे

सुपरमध्ये ४५ बालके दगावली -विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे नवजात शिशुसाठी एसएनसीयू विभाग आहे. येथे गंभीर बालकांना उपचारासाठी भरती केले जाते. येथे भरती असलेल्या नवजात शिशुंमधील तब्बल ४५ बालके ही उपचारादरम्यान दगावल्याची नोंद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: Shocking Child Mortality; Questions Raised on Healthcare System

Web Summary : Amravati district reports 383 child deaths and 26 maternal deaths in 2025-26, raising concerns about healthcare. Dufferin Hospital recorded the highest child deaths. Irvin Hospital saw the most maternal deaths. Low birth weight and delayed treatment are key factors.