शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांच्या संपकाळातील ७१ दिवसांच्या वेतनावर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:41 IST

एमफुक्टोच्या झेंड्याखाली प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७१ दिवसांचा संप पुकारला होता.

अमरावती : महाविद्यालयीन प्राध्यापकांनी ४ फेब्रुवारी ते १० मे २०१३ या कालावधीत पुकारलेल्या संपकाळातील ७१ दिवसांंच्या वेतन कपातीबाबत येत्या १४ आॅगस्ट रोजी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे हे या विषयावर तोडगा काढतील, असे पत्र विधानपरिषद सभापतींचे सचिव म. मु. काजे यांनी प्रसृत केले आहे.एमफुक्टोच्या झेंड्याखाली प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७१ दिवसांचा संप पुकारला होता. राज्य शासनाने प्राध्यापकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाने ७१ दिवसांच्या संपकाळातील वेतन कपात केली. ही बाब अन्यायकारक असल्याचे गाºहाणे संपकरी प्राध्यापकांनी शासनदरबारी मांडले होते.गत सहा वर्षांपासून वेतन कपातीची रक्कम परत मिळण्याची मागणी  आमदार श्रीकांत देशपांडे यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना क्रमांक ३६३ नुसार मांडून चर्चेत आणली. प्राध्यापकांनी हक्कासाठी लढा दिला. त्यांचे अवाजवी कपात करण्यात आलेले ७१ दिवसांचे वेतन परत मिळावे, अशी मागणी देशपांडे यांनी केली. त्यानुसार मंत्रालयात १४ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला ना. विनोद तावडे यांच्यासह आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, किशोर दरांडे, विक्रम काळे, ना.गो. गाणार, नुटाचे चेअरमन प्रवीण रघुवंशी, प्राचार्य आर.डी. सिकची, एन.एन. गवांडे, उच्च व तंत्र शिक्षण सचिव आदींचा समावेश राहणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती