शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्रुपा नदीत केमिकल मिसळल्याने खळबळ

By admin | Updated: July 26, 2014 20:59 IST

मनात्री परिसरात विद्रुपा नदीत मोठय़ा प्रमाणात केमिकल मिसळल्याने परिसरातील पाणी दूषित झाले

मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री परिसरात विद्रुपा नदीत मोठय़ा प्रमाणात केमिकल मिसळल्याने परिसरातील पाणी दूषित झाले असून, जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेल्हारा तालुक्यातील मनात्री परिसर हा नदीकाठचा भाग असून, या ठिकाणी अनेक वीटभट्टय़ा आहेत. वीटभट्टय़ांमध्ये वापरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केमिकल आणण्यात येते; परंतु बुधवारी अचानक विद्रुपा नदीला पूर आल्याने या परिसरात पाणी शिरले आणि केमिकलचा साठा पाण्यात मिसळला. या प्रकारामुळे परिसरातील पाणी काळे झाले आहे. पाच वर्षाआधी गावात अशाच प्रकारचे केमिकल पुरामध्ये मिसळल्यामुळे गावातील २५ जनावरांचा मृत्यू झाला होता. पुन्हा तीच स्थिती असल्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. मनात्री परिसरात वीटभट्टय़ांवर मनमानी पद्धतीने काम चालते. संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मोठय़ा प्रमाणात केमिकलचा वापर या भट्टय़ांमध्ये होत आहे. या परिसरातील पाणी केमिकलयुक्त झाल्यामुळे जनावरांना धोका निर्माण झाला आहे. ** विद्रुपा नदीमुळे नदीकाठची जमीन वाहून गेली असून, यामध्ये शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरेश पोटे नामक शेतकर्‍याचे पाईप व पंप वाहून गेले. महादेव वानखडे या शेतकर्‍याची जमीन खरडून गेली. महागड्या बियाण्यांची पेरणी केली असली तरी पिके वर येण्याची सुतराम शक्यता नाही. पाण्यामुळे मनात्री, पंचगव्हाण, डवला तळेगाव या गावांचा संपर्क तुटला होता. मनात्री गावातील सुनील डायलकर, गजानन वाघोडे, महादेव वानखडे, कैलास वानखडे, सुरेश पोटे, बाळू काळमेघ, श्रीकृष्ण वानखडे, बाळकृष्ण वानखडे, अनिल वानखडे यांचे नुकसान झाले आहे.