शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

राणांच्या कार्यालयावर सेनेचा हल्ला

By admin | Updated: December 27, 2016 00:48 IST

नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाच्या निर्मितीचा श्रेयवाद वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. राणांच्या

श्रेयाच्या लढाईला हिंसक वळण : राजकीय वाद पेटला, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल अमरावती : नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाच्या निर्मितीचा श्रेयवाद वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. राणांच्या पत्रपरिषदेनंतर उफाळून आलेल्या सेनेच्या संतापाचा सोमवारी उद्रेक झाला. नारेबाजी करीत आ. रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या बडनेरा येथील कार्यालयावर धडकलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयाबाहेर लावलेले बॅनर, बोर्ड फाडून खुर्च्यांची देखील तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे बडनेरासह अमरावती शहरातही काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आ. राणांसह अन्य दोन कार्यकर्त्यांनी झालेल्या प्रकाराची तक्रार बडनेरा पोलिस ठाण्यांत नोंदविली. तक्रारीच्या आधारे शिवसेना, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे मागील आठवड्यात बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे पुलाचे आ. राणा यांनी नाट्यमयरित्या उद्घघाटन केले होते. थोड्याच वेळात अडसुळांनीही पूलावर पोहोचून राणांचे फलक फाडून पुन्हा पूलाचे लोकार्पण केले. राणांनी या पूलाच्या निर्मितीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे अडसुळांनी बजावले. त्यानंतर राणांनी रविवारी थेट पत्रपरिषद अडसुळांना आव्हान दिले. राणांच्या राजापेठस्थित कार्यालयात गर्दी ४बडनेरात आ. राणांच्या कार्यालयाच्या तोडफोडीची घटना कळताच राणा समर्थकांनी राजापेठस्थित जनसंपर्क कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता.या घटनेचे पडसाद उमटून राजापेठ परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत राणांच्या या कार्यालयात पोलीस बंदोबस्त कायम होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बडनेरा पोलीस ठाण्यात राणांचा ठिय्या ४युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यालयाची तोडफोड करुन महिलेला मारहाण, शिवीगाळ तसेच महापुरुषांच्या प्रतिमांची नासधूस केल्याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आ. रवि राणा स्वत: बडनेरा पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन होते. यावेळी अजय जयस्वाल, नगरसेवक विजय नागपुरे, विलास वाडेकर, सिद्धार्थ बनसोड आदी उपस्थित होते. सेना कार्यालयांना पोलीस संरक्षणाची गरज नाही ४या घटनेनंतर परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी सेनेच्या कार्यालयांपुढे बंदोबस्त लावला होता. मात्र शिवसेनेला पोलीस संरक्षणाची गरज नाही, असे स्पष्ट करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी पोलीस संरक्षण नाकारले. त्यांनी बंदोबस्तासाठी आलेले पोलिस देखील परत पाठविले. ‘अ‍ॅक्शन’ ला ‘रिअ‍ॅक्शन’ हा निसर्गाचा नियम आहे. राणांनी केलेल्या कृत्याला शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले. ही केवळ सुरूवात आहे. राणांनी शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नये, अन्यथा यापुढे गंभीर परिणाम होतील. - आनंदराव अडसूळ खासदार, अमरावती. नरखेड रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असताना तो रहदारीसाठी सुरु व्हावा, यासाठी सिटीबस व आॅटोरिक्षा चालकांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, अडसुळांच्या गुंडांनी कार्यालयाची तोडफोड करुन त्यांची विध्वंसक संस्कृती दाखवून दिली आहे. अडसुळांसह युवासेनेच्या कार्यकर्त्यांना तातडीने अटक व्हावी - रवि राणा, आमदार, बडनेरा