शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये कमी दर्जाच्या खाद्य पदार्थांची विक्री

By admin | Updated: July 5, 2016 00:31 IST

सणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे.

एफडीएचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यातसंजय खासबागे  वरुडसणासुदीच्या दिवसांत भेसळीला अधिक उधाण येत असल्याचे चित्र असून तालुक्यात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ खाण्याची वेळ आली आहे. तालुक्यात ठोक व्यापाऱ्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यापर्यंत भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकले जातात. यामुळे अंगावर पूरळ येणे यासह त्वचेचे आजार वाढत आहेत. सणासुदीच्या दिवसांत तेलामध्ये पामोलीन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तेल गोठायला सुरुवात होते. हा प्रकार अलीकडे उघडकीस येत आहे. इतकेच नव्हे तर तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, तसेच गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ केली जात आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागला आहे. अन्न, औषधी प्रशासन विभागाने एखाद्या दुकानावर धाड टाकलीच तर नमुने बदलून तपासणीसाठी पाठविले जातात. त्यामुळे दुकानदारावर कारवाई होत नाही. तालुक्यात तेलमाफीयांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा अभय असल्याने ‘कुणीही आमचे काहीच वाकडे करू शकत नाही’, अशी त्यांची धारणा झाली आहे. अन्नात भेसळ करणाऱ्यांवर होणार का कारवाई ?जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करुन ग्राहकांची लूट होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणारे अधिकारी याकडे लक्ष देतील की वेळ मारून नेतील, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ गरिबांच्या माथी मारून अनेकांना आजाराने जडले आहे. वारंवार याबाबत चर्चा होत असून प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे. खाद्यपदार्थांमध्ये, धान्यामध्ये, तेलामध्ये भेसळीबाबतच्या तक्रारी आल्यास कारवाई केली जाते. या पदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविल्या जातात. इतकेच नव्हे तर प्रकरण न्यायालयासमक्ष ठेवले जाते. परंतु अद्याप तालुक्यातून अशी तक्रार आलेली नाही.- नीलेश ताथोड,अन्न,पुरवठा अधिकारी, अमरावती