शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2014 22:48 IST

जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या आणखी ६० हजारांहून अधिक शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे.

अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या आणखी ६० हजारांहून अधिक शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने तातडीने मदत मिळण्याच्या शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मदतीसाठी जिल्ह्यात आणखी ७० कोटी रुपयांची गरज भासणार आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात रबी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. पिके व फळबागाना शासनाने भरपाई मंजुरी केली. जिल्ह्यात या संकटामुळे शेतकर्‍यांचे सुमारे १४० कोटी रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख २५ हजार ८३८ शेतकर्‍यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. त्यापैकी काही शेतकर्‍यांना निधी वितरित झाला असला तरी बहुतांश शेतकर्‍यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत शासनाने जिल्ह्याला दोन टप्प्यात ७२ कोटी रुपयांची मदत केली. यात सर्वाधिक निधीचे वाटप धामणगाव तालुक्यातील गारपीटग्रस्तांना झाले आहे. आणखी यामध्ये सुमारे ७० कोेटींची रक्कम जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी प्रशासनाने शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी प्राप्त होताच उर्वरित शेतकर्‍यांना मदत निधीचे वाटप सुरु केले जाणार असल्याचे महसुल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)