शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने गाजविला दुसरा दिवस

By admin | Updated: October 1, 2015 00:05 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात एकांकिका, मूकनाट्य, सुगम संगीताची मेजवानी; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

खामगाव : युवा महोत्सवात सलग दुसर्‍या दिवशीही तरुणाईने आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या, अँसिड हल्ला, पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास यांसह समाजातील वाईट चालीरीतींवर हल्ला चढविला. एकाहून एक सरस सादरीकरणाने या महोत्सवातील दुसरा दिवस गाजविला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने स्थानिक गो.से. महाविद्यालयातील युवा महोत्सवात बुधवारी दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंंत विविध स्पर्धांंचे सादरीकरण झाले. यामध्ये अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांंनी लोकनृत्य, सुगम संगीत, भारतीय समूहगान, एकांकिका, स्कीट व माइम, वादविवाद, पोस्टर मेकिंग आणि स्पॉट पेंटिंग स्पर्धेत सादरीकरणासाठी अनेक विद्यार्थ्यांंमध्ये चढाओढ लागली होती. आयोजक महाविद्यालयांसह मंगळवारी परीक्षकांकडून झालेल्या चुकांमध्ये बुधवारी कमालीची दुरुस्ती झाली होती. त्यामुळे सादरीकरणासाठी अनुकूल वातावरण लाभल्याने नाट्यकलावंतांसह विविध स्पर्धांंमध्ये सहभागी विद्यार्थ्यांंचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गो.से. महाविद्यालयातील इनडोअर हॉलमध्ये यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या लोकनृत्य स्पर्धा पार पडल्या. खोली क्र.६ मध्ये सुगम संगीत, समूहगान, तर स्व. शंकरराव बोबडे सभागृहात एकांकिकांते सादरीकरण झाले. बॅटमिंटन हॉलमध्ये स्कीट आणि माइम, खोली क्र. १४ मध्ये वादविवाद स्पर्धा, तर १५ मध्ये वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे पोस्टर मेकिंग आणि स्पॉट पेंटिंग स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या. या सर्वच स्पर्धांंमध्ये सहभागी होण्यासाठी अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंमध्ये चांगलीच लगबग दिसून आली. पोस्टर मेकिंग स्पर्धेत विविध महाविद्यालयातील सहभागी स्पर्धकांनीही शेतकरी आत्महत्या, पर्यावरण जागृती, स्त्रीभ्रूणहत्या, जलप्रदूषण यांसारख्या विषयांना हात घातला. या महोत्सवातील विविध स्पर्धांंमध्ये उत्कृष्ट ठरणार्‍या विद्यार्थ्यांंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड होणार असल्यामुळे सादरीकरणासाठी विद्यार्थी अतोनात परिश्रम घेत असल्याचे चित्र सर्वच स्पर्धांंमध्ये दिसून आले. या संपूर्ण स्पर्धांंंंसाठी शेगाव येथील विश्‍वकर्मा डिजिटलच्यावतीने उत्कृष्ट मंचसजावट, तर गोपाल शर्मा यांनी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून दिली.