शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाच्या विकासावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 8, 2017 00:06 IST

बेलोरा विमानतळाचा विकास करण्याबाबत राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याकरिता १२५ कोेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

१२५ कोटींची तरतूद : आॅगस्ट २०१६ मध्ये पाठविलेला प्रस्ताव मंजूरअमरावती : बेलोरा विमानतळाचा विकास करण्याबाबत राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याकरिता १२५ कोेटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणात कोल्हापूरसह १० विमानतळांच्या यादीत बेलोरा विमानतळाचा विकास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.बेलोरा विमानतळ हे जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, आ.वीरेंद्र जगताप, आ.रवि राणा आदी लोकप्रतिनिधींनी या विमानतळाच्या चौफेर विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या चमुने मे २०१६ मध्ये बेलोरा विमानतळाची पाहणी केली होती. बेलोरा विमानतळाचा विकास करताना येथे विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची चाचपणीदेखील केली होती. परंतु आता शासनाने बेलोरा विमानतळाचा कायापालट करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे धावपट्टीत वाढ करताना १३७२ वरून १८५० मीटर लांबीची बनविली जाईल. अद्ययावत टर्मिनल इमारत, नवीन जलकुंभ, विश्रामगृह, नवीन इमारत, नाईट लँडिंगची व्यवस्था, विमानतळाला संरक्षण भिंत, सुसज्ज एटीएस टॉवर आदी विमान सेवेसाठी लागणाऱ्या बाबीची पूर्तता केली जाईल. मजीप्राच्या बडनेरा येथील जलकुंभावरून विमानतळपर्यंत नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली आहे. केवळ ही जलवाहिनी जलकुंभाला जोडण्याचे काम बाकी आहे. तसेच जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. लांबीचा वळण मार्ग डांबरीकरणाने तयार होत आहे. २८३ हेक्टर जमीन अधिग्रहितअमरावती : हा वळण मार्ग पूर्णत्वास आल्यास यवतमाळ मार्गावरील वाहतूक बंद केली जाईल. यवतमाळ मार्गे ये-जा करणाऱ्या वाहनांना अकोला मार्गावरून बेलोरा वळण मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरणासाठी २८३ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक यांनी सामान्य प्रशासन एव्हिऐशन सचिवांना विमानतळाच्या विकासासाठी यापूर्वी पाठविलेल्या ७७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाऐवजी १२५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळाचा विकास होईल, यात दुमत नाही. (प्रतिनिधी)अमरावतीहून विमानसेवा सुरू झाली पाहिजे, यासाठी बेलोरा विमानतळाच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. अर्थसंकल्पात १२५ कोटींची तरतूद झाल्याने विमानतळाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.- प्रवीण पोटे, पालकमंत्रीबेलोरा विमानतळाचा विकास व्हावा, यासाठी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक उपक्रम समितीने दौरा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार राज्य शासनाकडे अहवाल सादर केला. आता विमानतळाच्या विकासासह ७२ आसनी विमान सेवा सुरू होईल.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती