शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अमरावती जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस ३० पर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 21:36 IST

अमरावती जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यत बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देपान, तंबाखू, दारूविक्रीला परवानगी, सार्वजनिक ठिकाणी वापरास मात्र मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यत बंद राहणार आहेत. मार्केट रात्री ९ पर्यंत सुरू राहील. हॉटेल, लॉज पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. दारू, पान, तंबाखू, तंबाखजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली; तथापि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या वापरास मनाई करण्यात आलेली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केला.

‘मिशन बिगेन अगेन’अंर्तगत नव्याने संचारबंदीचे आदेश जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यत राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. सार्वजनीक ठिकाणी दोन व्यक्तींमधील अंतर कमीत कमी सहा फुटांचे असावे. दुकानातदेखील दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याची दक्षता घ्यायला हवी. एकाच वेळी पाचपेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाहीत, याचीदेखील दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे, असे आढळल्यास नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

या कालावधीत अधिकाधिक लोकांना घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी. याशिवाय दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. या सर्व ठिकाणी थर्मल स्कॅनिंग , हॅन्डवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करावी. कामगारांमध्ये सुरक्षित अंतर, दोन शिफ्टमध्ये अंतर व दुपारच्या वेळी जेवनांच्या वेळांमध्ये अंतर असावे, असे निर्देश आहेत. सर्व शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहतील. याशिवाय वर्ग ‘अ’ व ‘ब’ श्रेणीमधील कर्मचारी पूर्णक्षमतेसह उपस्थित राहतील. महापालिका क्षेत्रात ३० टक्के, इतर क्षेत्रातील कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील. ६५ वर्षांवरील वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षावरील मुले यांनी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळता घराबाहेर पडू नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

प्रत्येक कार्यालयात दक्षता अधिकारीकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी याची दक्षता घेण्यासाठी दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश आहेत. कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करुन देण्यात यावे. अन्य सुविधा उपलब्ध कराव्यात. खासगी कार्यालयात ३० टक्के आस्थापनेसह सुरू ठेवता येतील. कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे व दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अ‍े आदेशात नमूद आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस