अमरावतीच्या अचलपूर पालिकेत ४७ कोटींचा घोटाळा ! मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:50 IST2026-01-17T15:46:27+5:302026-01-17T15:50:52+5:30

Amravati : अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत अचलपूर नगरपरिषदेत गेल्या १५ वर्षापासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Scam of Rs 47 crore in Achalpur Municipality of Amravati! A basket of bananas against the order of the Human Rights Commission? | अमरावतीच्या अचलपूर पालिकेत ४७ कोटींचा घोटाळा ! मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली?

Scam of Rs 47 crore in Achalpur Municipality of Amravati! A basket of bananas against the order of the Human Rights Commission?

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा :
अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीत अचलपूर नगरपरिषदेत गेल्या १५ वर्षापासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने आदेश देऊनही वर्षभर कोणतीही कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते किशोर केशवराव मोहोड यांनी ५० कार्यकर्त्यांसह १६ फेब्रुवारीपासून मुंबईत मंत्रालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

अचलपूर नगरपरिषदेत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या विविध लेखाशीर्षांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा अपहार करण्यात आल्याचा दावा मोहोड यांनी केला आहे. सुमारे ४७ कोटी ४८ लाख रुपयांचा शासकीय निधी इतरत्र वळवून त्याचा कायमस्वरूपी अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दाद मागितली होती.

मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली?

राज्य मानवी हक्क आयोगाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधान सचिव (नगरविकास-२) यांना या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, वर्ष लोटूनही शासनाने कोणतीही घटनात्मक कारवाई केली नाही. उलट, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोपही मोहोड यांनी नगरविकास विभागाला दिलेल्या नोटीसमध्ये केला आहे.

१६ फेब्रुवारीपासून उपोषण

किशोर मोहोड १६ फेब्रुवारीपासून मंत्रालयाच्या आवारात ५० समर्थकांसह बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी पोलिस महासंचालक व नगरविकास विभागाला कळविले आहे.

"१५ वर्षांपासून दलित वस्तीच्या हक्काचा पैसा लुटला जात आहे. मानवी हक्क आयोगाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे."
- केशवराव मोहोड (तक्रारदार)

Web Title : अचलपुर नगरपालिका घोटाला: ₹47 करोड़ का गबन, मानवाधिकारों की अनदेखी?

Web Summary : अचलपुर नगरपालिका की दलित आवास योजना में ₹47 करोड़ के घोटाले का आरोप है। मानवाधिकार आयोग के जांच के आदेश के बावजूद कोई कार्रवाई नहीं हुई। कार्यकर्ता किशोर मोहोड़ ने मुंबई में भूख हड़ताल की धमकी दी है।

Web Title : Achalpur Municipality Scam: ₹47 Crore Embezzlement, Human Rights Ignored?

Web Summary : A ₹47 crore scam in Achalpur Municipality's Dalit housing scheme is alleged. Despite Human Rights Commission orders for investigation, no action has been taken. Activist Kishore Mohod threatens hunger strike in Mumbai.