संत भिकुजी महाराज जन्मोत्सव ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:43+5:302021-02-05T05:32:43+5:30

चाळीस हजार भाविकांनी घेतले दर्शन, मंदिर परिसरात जय भिकाराम चा जयघोष धामणगाव रेल्वे : विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आष्टा ...

Sant Bhikuji Maharaj Janmotsav Online | संत भिकुजी महाराज जन्मोत्सव ऑनलाईन

संत भिकुजी महाराज जन्मोत्सव ऑनलाईन

चाळीस हजार भाविकांनी घेतले दर्शन, मंदिर परिसरात जय भिकाराम चा जयघोष

धामणगाव रेल्वे : विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आष्टा येथील श्री संत भिकुजी महाराज यांच्या जन्मोत्सवाला तब्बल ४० हजार भाविकांनी ऑनलाइन दर्शन घेतले.

तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेले ७४० लोकसंख्येचे गाव तीर्थक्षेत्र आष्टा म्हणून विदर्भात परिचित आहे. दरवर्षी २९ जानेवारी रोजी संत भिकुजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे हा जन्मोत्सव ऑनलाईन पार पडला. पहाटे ४ वाजता संत भिकुजी महाराज यांचे अमृतस्नान करण्यात आले. त्यानंतर ५ वाजता मंदिर परिसरात दिंडी काढण्यात आली. यावेळी मोजक्या भाविकांची उपस्थिती होती. भागवत सप्ताहाचा सांगता हभप पौर्णिमा गजबे (भोंडवे) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सायंकाळपर्यंत राज्यातील ४०हजार भाविकांनी संत भिकुजी यांचे ऑनलाइन दर्शन घेतले. पोलिसांनी भाविकांना गावबंदी केली होती. त्यासाठी चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

----------------

Web Title: Sant Bhikuji Maharaj Janmotsav Online