अनुसूचित कल्याण समितीच्या दौऱ्याची प्रशासनात धावपळ

By Admin | Updated: September 12, 2016 00:15 IST2016-09-12T00:15:22+5:302016-09-12T00:15:22+5:30

विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हयाचे नियोजित दौऱ्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्याने ...

Running in the administration of scheduled welfare committee | अनुसूचित कल्याण समितीच्या दौऱ्याची प्रशासनात धावपळ

अनुसूचित कल्याण समितीच्या दौऱ्याची प्रशासनात धावपळ

१९ पासून जिल्हा दौरा : कामकाजाची होणार झाडाझडती
अमरावती : विधिमंडळ सचिवालयाने अनुुसूचित जमाती कल्याण समितीचा जिल्हयाचे नियोजित दौऱ्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्हा परिषद, महसूल, वीज वितरण कंपनी, महापालिकेत या समितीच्या दौऱ्यासाठी प्रशासनात लगबग सुरू झाली आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून ही समिती जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा समितीच्या आढाव्यात कुठल्याही उणिवा राहू नये, यासाठी कामाला लागली आहे.
ऐन सुट्यांच्या दिवशी कार्यालयाकडे न फिरकणारे कर्मचारी सुटीच्या दिवशीही एसटी कमेटीच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय कामकाज करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ही पुढील आठवडयात अनुसुचित जमाती कल्याण समितीचे पदाधिकारी १९ सप्टेंबर मंग़ळवारी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहे. त्यानंतर सकाळी वाजेपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत अनुुसूचित जमातीच्या कल्याणकारी योजना व अडचणीबाबत अनौपचारिक चर्चा करून माहिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुुसूचित जमातींच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती, बढती, आरक्षण, व अनुशेष, जातपडताळणी विषयक बाबी तसेच आदिवासी क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
याशिवाय विद्युत वितरण कंपनी, यासोबतच महापालिका आस्थापन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, संत गाडगेबाबा विद्यापीठ आदी ठिकाणीही ही समिती भेट देऊन तेथेही अनुसूचित जमाती प्रवार्गातील भरती, बदली, आरक्षण व अनुशेष आदी विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर २० सप्टेंबर बुधवार रोजी जिल्ह्यातील आश्रम शाळा, वसतीगृह व यंत्रणानिहाय केलेल्या कामांची पाहणी करणार आहे.
यात आदिवासी क्षेत्रात उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत केलेल्या कामांची झाडाझाडती घेण्यात येणार आहे. या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून समिती समोर कुठल्याही उणिवा दिसून येऊ नये, याची खबरदारी मात्र बाळगत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

१५ आमदारांचा समितीत समावेश
विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीमध्ये एकूण १५ आमदारांचा समावेश राहणार आहे. याशिवाय विधिमंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकारीसुध्दा या समितीसोबत जिल्ह्याचे तीन दिवसीय दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेने यासाठी आवश्यक तयारी आतापासूनच सुरू केली आहे.

Web Title: Running in the administration of scheduled welfare committee