आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 17, 2023 04:31 PM2023-10-17T16:31:53+5:302023-10-17T16:32:58+5:30

अपात्र असतांना ‘पीएम किसान’च्या ३२ कोटींचा घेतला लाभ

'Revenue' notices to 26 thousand farmers paying income tax; Employed accountants are also on the radar | आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर

आयकरदात्या २६ हजार शेतकऱ्यांना ‘महसूल’च्या नोटीस; नोकरदार खातेदारही रडारवर

अमरावती : शासकीय व निमशासकीय नोकरदार व आयकरदाते शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अपात्र असतांनाही जिल्ह्यात तब्बल २६२१२ जणांनी लाभ घेतलेला आहे. आता ही रक्कम वसूल करण्यासाठी महसूल विभागाद्वारा संबंधितांना नोटीस बजावणे सुरु केले आहे. घेतलेला लाभ परत न केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची तंबी नोटीसद्वारे दिल्या जात आहे.

पीएम किसान सन्मान योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात प्रत्येकी सहा हजारांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत दोन हजार रुपयांचे १४ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे. योजनेत अपात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने शासनस्तरावर पडताळणी करण्यात आली. यामध्ये २६२१६ शेतकरी शासकीय व निमशासकीय नोकरदार व आयकराचा भरणा करणारे आढळले. त्यामुळे या खातेदारांचा लाभ बंद करण्यात आला व त्यांनी लाभ घेतलेल्या ३१.५५ कोटींची वसुली आता करण्यात येत आहे.

Web Title: 'Revenue' notices to 26 thousand farmers paying income tax; Employed accountants are also on the radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.