शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या मान्सूनचा विदर्भात १५ आॅक्टोबरपर्यंत मुक्काम

By admin | Updated: October 8, 2014 22:57 IST

विदर्भापासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. परतीच्या मान्सूनचा मुक्काम १५ आॅक्टोबरपर्यंत राहणार असल्यामुळे दुपारच्या वेळी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

वैभव बाबरेकर - अमरावतीविदर्भापासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात आहेत. परतीच्या मान्सूनचा मुक्काम १५ आॅक्टोबरपर्यंत राहणार असल्यामुळे दुपारच्या वेळी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.गेल्या तीन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मुक्ती मिळाली. सध्या दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणाचा अनुभव अमरावतीकर घेत आहे. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने बुधवारपर्यंत त्याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता होती. विदर्भावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच लक्षदीप व ओडीशाच्या किनारपट्टीवर सुध्दा चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भातील तुरळक ठिकाणी दुपारच्या वेळेत पावसाची शक्यता आहे. तसेच परतीचा मान्सून येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत मुक्कामी राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. परतीच्या मान्सूनचा मुक्काम वाढल्याने जिल्ह्यात कधीही पाऊस बरसू शकतो. ढगाळी वातावरण व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.