शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसाद अ‍ॅप, अवघ्या ६ मिनिटांत 'अलर्ट'!

By admin | Updated: March 8, 2016 00:17 IST

आता कुठेही संकटात सापडलेल्या आणि मदतीची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांपर्यंत अवघ्या ६ मिनिटांमध्ये पोलिसांकडून मदत पोहोचणार आहे.

स्मार्ट पोलिसिंग : सोशल मीडियाचा खुबीने वापर अमरावती : आता कुठेही संकटात सापडलेल्या आणि मदतीची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांपर्यंत अवघ्या ६ मिनिटांमध्ये पोलिसांकडून मदत पोहोचणार आहे. पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम कमी करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘प्रतिसाद’ अ‍ॅप कार्यान्वित होणार आहे. या अ‍ॅपचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी प्रस्तावित आहे.४.१ व्हर्जन असलेल्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये प्रतिसाद पीसीआर आणि प्रतिसाद हे दोन्ही अ‍ॅप इन्स्टॉल करता येतील. यातील प्रतिसाद पीसीआर हा पोलिसांसाठी तर प्रतिसाद हे अ‍ॅप राज्यातील जनतेसाठी आहे. प्रतिसाद अ‍ॅप डाऊनलोड केल्यास संकटाच्या वेळी अवघ्या ६ मिनिटात पोलिसांना ‘अलर्ट’ जाईल. कंट्रोलरुममधील डॅशबोर्डवर तो अलर्ट ६ मिनिट दिसेल. संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना तो अलर्ट स्वीकारावा लागेल अन्यथा कंट्रोल रुमकडून संबंधित व्यक्तीकडे पोलीस कुमक पोहचेल यासाठी संबंधित व्यक्तीने प्रतिसाद अ‍ॅप डाऊनलोड करून अलर्ट देणे आवश्यक आहे. इमरजंसीत 'अलर्ट' प्रेस केल्यानंतर पोलिसांसह नोंदणी केलेल्या ३ नातेवाईकांच्या मोबाईलवर 'अलर्ट' एसएमएस जातील. याशिवाय मोबाईलधारकाचे जीपीएस लोकेशनही ट्रेस होईल. (प्रतिनिधी)एका क्लिकवर पोलिसांचा प्रतिसाददरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खून, बलात्कार, छेडछाड, अपघात, दहशतवादी कारवाया, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी त्वरित पोलीस मदत व्हावी, याकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिसाद मोबाईल अ‍ॅप्लीकेशन सुरू होणार आहे. ‘गुगल प्ले स्टोर’मधून शहर परिसरातील नागरिकांनी ‘प्रतिसाद अ‍ॅप’ डाऊनलोड करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी केले आहे. आयुक्तालयातील १२०० कर्मचारी टेक्नोसेव्हीशहर आयुक्तालयाचे मनुष्यबळ १८०० चे जवळपास आहे. त्यापैकी १२०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ई-मेल अ‍ॅड्रेस आहेत. त्या अनुषंगाने ‘प्रतिसाद पीसीआर अ‍ॅप’मध्ये या कर्मचाऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करून स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करायचा आहे. या अ‍ॅपमध्ये १२०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पदनाम, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक नोंदणीबध्द करण्यात आला आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला कार्यरत आहात, त्याबद्दलची माहितीही यात आहे. ४.१ व्हर्जनप्रतिसाद आणि प्रतिसाद पीसीआर अ‍ॅप्स ४.१ व्हर्जन स्मार्ट फोनमधील प्ले स्टोरमधून डाऊनलोड करून इंस्टॉल करता येणार आहे.