घरकुलांच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचा ठिय्या

By Admin | Updated: October 11, 2016 00:21 IST2016-10-11T00:21:08+5:302016-10-11T00:21:08+5:30

नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना मागील कित्येक वर्षांपासून घरकूल मिळालेले नाही.

The Republican army's demand for a housework | घरकुलांच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचा ठिय्या

घरकुलांच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचा ठिय्या

घरकुलांना मंजुरी दिल्याचा उल्लेख : तहसीलवर पोलिसांचा बंदोबस्त
दर्यापूर : नगर परिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना मागील कित्येक वर्षांपासून घरकूल मिळालेले नाही. या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे सोमवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पालिकेने स्थायी समितीच्या २२ मार्च १९९० च्या ठराव क्र. ३ अन्वये झोपडपट्टीतील घरांची नोंद घेऊन घरकुलांना मंजुरी दिल्याचा स्पष्ट उल्लेख सन १९९१ च्या असेसमेंट नक्क्लवर आहे. यानुसार या अतिक्रमणधारकांची नोंद नझुल दप्तरी घेण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. रमाई आवास योजनेंतर्गत सन १९९५ च्या पूर्वी झोपडपट्टीत राहणारे अनुसूचति जाती व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्याचे आदेशान्वित करण्यात आले आहे. मात्र, या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंतही घरकुलांचा लाभ मिळालेला नाही. शहरातील एकूण १२५४ लाभार्थींचे अर्ज नगरपालिकेत प्रलंबित आहेत. तहसीलदार राहुल तायडे यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करून सन १९९० पूर्वीचे अर्ज मागवून ते भरून घेतलेत आणि त्यांचे जाहिरनामेदेखील काढले आहेत. परंतु झोपड्यांची नोंद नझूल रेकॉर्डला अद्यापही घेतली गेली नाही, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला.
आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे जिल्हा संघटक संजय चोरपगार, साहेबराव वाकपांजर, संतोष कोल्हे, लक्ष्मण सावळे, सीताराम खंडारे, दिलीप रूपनारायण, रतन धुराटे आदींचा सहभाग होता. या प्रकरणात तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार राहुल तायडे यांनी दिले. यावेळी महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्तदेखल करण्यात आला होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Republican army's demand for a housework