शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव अनुदान सोडाच; हाती केवळ ५.९७ कोटी

By admin | Updated: March 3, 2017 00:23 IST

एलबीटीच्या उत्पन्नामध्ये येणारी घट भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात वाढ अपेक्षित

महापालिकेवर आर्थिक गंडांतर : ‘नगरविकास’चा धक्काअमरावती : एलबीटीच्या उत्पन्नामध्ये येणारी घट भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात वाढ अपेक्षित असताना नगरविकास विभागाने अमरावती महापालिकेला जोरदार धक्का दिला आहे. आतापर्यंत महिन्याकाठी ७.२७ कोटींचे अनुदान येत असताना २८ फेब्रुवारीला महापालिकेच्या नावे केवळ ५.९७ कोटी रूपयेच आले आहेत. त्यातही हे अनुदान जानेवारी महिन्यातील स्थानिक संस्थाकराची तूट भरून काढण्यासाठी असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील आर्थिक तूट मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एलबीटी सहायक अनुदानात सुमारे सव्वा कोटी रूपयांची आलेली घट ही महापालिकेची आर्थिक शिस्त बिघडविणारी ठरली आहे. यापूर्वीच महापालिकेला एलबीटी तुटीमधील तफावतीपोटी ४५ ते ५० कोटी रूपये राज्य शासनाकडून घ्यायचे आहेत.१ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटींपेक्षा कमी आर्थिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना स्थानिक संस्था कर भरण्यापासून सूट दिली. यामुळे महापालिकांची आर्थिक स्थिती कोलमडली. महापालिकांच्या उत्पन्नामध्ये येणारी तूट भरून काढण्यासाठी यापुढे १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार आणि ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून महापालिकांना प्राप्त होणारे स्थानिक संस्था करापासूनचे उत्पन्न हा पर्यायी स्त्रोत उपलब्ध आहे. तसेच यापर्यायी स्त्रोतापासून होणारे उत्पन्न व सन २०१६-१७ मध्ये महापालिकांना प्राप्त होणारे एलबीटीपासूनचे संभाव्य उत्पन्न यामध्ये येणारी तूट भरून काढण्यासाठी शासनाकडून सहायक अनुदान दिले जाते. याच अनुदानात ७.२७ कोटींच्या तुलनेत अमरावती मनपाला केवळ ५.९७ कोटी मिळालेत. एकीकडे एलबीटी सुरू असताना महापालिकेचे मासिक उत्पन्न ९ ते १० कोटी रुपये होते.अधिक मदतीची गरजएलबीटी आणि जकात या दोन्ही करप्रणाली संपुष्टात आल्याने महापालिकेचे आर्थिक स्त्रोत मर्यादित झाले आहेत. ‘ड’ वर्ग महापालिकांची मदार तर केवळ मालमत्ताकर आणि बांधकाम परवानगी शुल्कातून येणाऱ्या महसुलावर आहे. एलबीटी किंवा जकात ही कोणतीही प्रणाली सद्यस्थितीत अस्तित्वात असती तर महापालिकेचे उत्पन्न वर्षाकाठी १०० ते ११० कोटी पर्यंत गेले असते. मात्र, त्या तुलनेत आतापर्यंत ७.२७ कोटी अर्थात वर्षाला ८७.२४ कोटी रुपयापर्यंत मर्यादित अनुदान मिळाले. १०० ते ११० कोटींचे अपेक्षित उत्पन्न धरल्यास शासनाकडून महापालिकेला ३५ ते ४५ कोटी रुपये घेणे आहेत. त्यातुलनेत जानेवारी महिन्याची तूट म्हणून अवघे ६.५७ कोटी रूपये दिल्याने महापालिकेची मुस्कटदाबी झाली आहे.