विद्यापीठात ६३ हजार ऑनलाईन नामांकनाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST2021-02-16T04:15:32+5:302021-02-16T04:15:32+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आतापर्यंत ६३ हजार ऑनलाईन नामांकनाची नोंदणी करण्यात आली आहे. एकूण १ लाख १० ...

Registration of 63,000 online enrollments in the university | विद्यापीठात ६३ हजार ऑनलाईन नामांकनाची नोंदणी

विद्यापीठात ६३ हजार ऑनलाईन नामांकनाची नोंदणी

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आतापर्यंत ६३ हजार ऑनलाईन नामांकनाची नोंदणी करण्यात आली आहे. एकूण १ लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी ६३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पाचही जिल्ह्यातील ३८४ महाविद्यालयांत नोंदणी सुरु आहे. पहिल्यांदाच ऑनलाईन नामांकन नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे.

यूजीसीच्या निर्देशाप्रमाणे महाविद्यालये, विद्यापीठाचे कामकाज हे ऑनलाईन असावे, असे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने यावर्षीपासून ऑनलाईन परीक्षा फार्म व नामांकनाची प्रक्रिया आरंभली आहे. ऑनलाईन परीक्षा फार्मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ऑनलाईन नामांकन उपक्रमालाही विद्थार्थी भरभरून प्रतिसाद देत आहे. हल्ली महाविद्यालयातील ऑफलाईन शिक्षण व्यवस्था बंद असली तरी परीक्षा फार्म, नामांकन नोंदणी सुरु आहे. प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. सोमवारपर्यत ६३ हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन नामांकन नोंदणी आटोपली होती. आता केवळ ४७ हजार विद्यार्थी ऑनलाईन नोंदणीपासून दूर आहे.

---------------

कोट

प्रथमच ऑनलाईन नामांकन नोंदणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया महाविद्यालयांमध्ये सुरु आहे. विद्यार्थ्यांना अचूक माहिती भरावी लागत आहे. हीच माहिती पुढे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीकरिता कायम राहील.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.

Web Title: Registration of 63,000 online enrollments in the university