शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा-वडाळी वनक्षेत्रात ‘रेड अलर्ट’

By admin | Updated: April 1, 2017 00:30 IST

गुरुवारी पोहरा जंगलात कुणी तरी अज्ञातांनी ठिकठिकणी तीन बिटला आग लावून वन्यजीवांचा अधिवास जाळण्याचा प्रयत्न केला.

पाच हजारांचे बक्षिस जाहीर : एकाच वेळी तीन ठिकाणी वनक्षेत्र जाळलेअमोल कोहळे पोहराबंदीगुरुवारी पोहरा जंगलात कुणी तरी अज्ञातांनी ठिकठिकणी तीन बिटला आग लावून वन्यजीवांचा अधिवास जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र भर उन्हात आग विझविणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनी मरणाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळविले आहे. वनविभागाने काठेवाडी, मेंढपाळ व इतरांविरुद्ध गुरे चारण्यास रोखले होते. उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीणा यांनी जबरदस्त मोहीम राबवून गुराख्यांना सळो की पळो करून सोडले. लाखों रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्यामुळे या जंगलाची वाटचाल समृद्धी जंगलाकडे सुरू असताना कुणीतरी जंगलाला आगी लावून राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. काल पोहरा बिट वनखंड क्रमांक ४० उत्तर चोरांबा बीट ७८ व इंदला बीटच्या ७० वनखंडात भर दुपारी आग लावली. इंदल्यातील घनदाट जंगलात आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी कठलीही तमा न बाळगता इंदल्यातील आगीवर ब्लोअर मशीन लावून आग विझविले असताना दुपारी ३ वाजताचे सुमारास बोडणा तपोनेश्वर व पोहरा रोडवरच्या जंगलात दोन ठिकाणी आग लावून जंगल जाळण्यात आले. आगीत वन्यजीव हानी झाली नसली तरी जंगल काळेशार झाले आहे. याप्रकरणी तीन वनगुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांना सूचना देण्यात आली आहे.पश्चिम मेळघाटातील जंगलात आगीचे तांडवधारणी : उन्हाळा लागल्यास जेमतेम सुरूवात झाली असतानाच मेळघाटातील जंगलात वणवा पेटण्याचा प्रकार सुरू झाला आहे. सध्या पश्चिम मेळघाटातील जवळपास सर्वच जंगल आगीच्या विळख्यात सापडल्याने पर्यावरणात संकट निर्माण झाले आहे. सर्वत्र आगीचे तांडव सुरू झाल्याने वन्यप्राण्यांनी जंगलातून स्थलांतरण करून गावाकडे पळ काढले आहे. पश्चिम मेळघाटात धारणी धूळघाट रेल्वे आणि ढाकणा हे प्रादेशिक वन परिक्षेत्र आहे. हरिसाल, चौराकुंड, तारुबांदा आणि ढाकणा हे व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र आहेत. हे सर्व आग जंगलाला लागून असलेल्या गावातील मोहाफुलांच्या झाडाखालील पाने जाळण्यातून उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, गावातील नेमक्या कोणत्या व्यक्तीकडून हे आग लावली गेली आहे. याचा तपासात संपूर्ण वन विभागाने आपली ताकद लावून दिली आहे. त्यात त्यांना अपयशच येत आहे. (तालुका प्रतिनिधी)