शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

बहिरमात रेकॉर्डब्रेक गर्दी, कोरोना नियमाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

परतवाडा : श्रीक्षेत्र बहिरमला यंदा यात्रा नसतानादेखील रविवारी भाविकांची लक्षवेधक गर्दी राहिली. यावर्षीची ही रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली. पौष रविवारला ...

परतवाडा : श्रीक्षेत्र बहिरमला यंदा यात्रा नसतानादेखील रविवारी भाविकांची लक्षवेधक गर्दी राहिली. यावर्षीची ही रेकॉर्डब्रेक गर्दी ठरली.

पौष रविवारला दरवर्षीच बहिरमबाबाच्या दर्शनाला यात्रेनिमित्त भक्तांची गर्दी राहते. पण, यंदा यात्रेअभावी कोरोनामुळे ही गर्दी थांबली होती. दरम्यान रविवार, ३१ जानेवारीला ही गर्दी पहिल्यांदा बघायला मिळाली.

यात जवळपास ५० हजारांवर भाविकांनी बहिरमबुवाचे दर्शन घेतले. भाविकांना दर्शनाकरिता रांगेत बराच वेळ थांबावे लागले. चालत राहावे लागले. बाहेरून ओट्यावरूनच त्यांना बहिरमबुवाचे दर्शन घ्यावे लागले. मंदिर व्यवस्थापनाने कुणालाही आत, गर्भगृहात प्रवेश दिला नाही.

दरम्यान भाविकांनी मोठ्या श्रद्धेने बहिरमबाबाला रोडग्याचा नैवद्य चढविला. कणकेचेहजारो दिवे अर्पण केलेत. नारळही मोठ्या प्रमाणात फोडलेत. आिदवासी बांधवही सकाळीच बहिरम परिसरात पोहचलेत. त्यांनी आपले नवसही फेडलेत. नवसापोटी आणलेले बकरे, बोकूड, त्यांनी पायरीने मंदिराच्या घंट्यापर्यंत आणलेत. वरच्या अखेरच्या पायरीवरच त्यांचे पूजन करून परत त्यांना खाली घेऊन गेलेत आणि वनसाच्या जेवणाचा सामूहिक आस्वाद घेतला.भाविक आपापल्या वाहनाने सकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झालेत. यात दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहिली. मंदिराजवळील वाहनांचे पार्किग फुल्ल झाले होते. वरील पार्किंगमध्ये जागा शिल्लक न राहिल्यामुळे जिथे-तिथे भाविकांनी आपली वाहने उभी केली होती. यात मंदिरावर जाणाऱ्या रस्त्यावरच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहनांचा जामही यात चालला.

बहिरम परिसरात जागा मिळेत तेथे सर्वदूर अनेकांनी रोडग्याचे स्वयंपाक केले. शेतातही हे स्वयंपाक होते. यामुळे रोडग्याच्या भाजणीचा आणि हंडीतील भाजीचा सुगंध परिसरात यंदा पहिल्यांदा दरवळला. या जेवणासाठी येणाऱ्या आमंत्रितांची संख्याही लक्षवेधक होती. यातच भागवताच्या समाप्तीनिमित्त आयोजित महाप्रसादामुळे लोकांच्या गर्दीत अधिकच भर पडली.