शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्यांच्या आरा गिरण्यांवर धाडी

By admin | Updated: September 18, 2014 23:28 IST

बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेला धोका रोखण्यासाठी शासनाने वनसंरक्षणाचे मापदंड ठरविले आहे. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी आरागिरण्यांची दरदिवशी तपासणी चालविल्याने

अमरावती : बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेला धोका रोखण्यासाठी शासनाने वनसंरक्षणाचे मापदंड ठरविले आहे. त्यानुसार वनअधिकाऱ्यांनी आरागिरण्यांची दरदिवशी तपासणी चालविल्याने हे नवे मापदंड आरागिरण्यांच्या मुळावर घाला घालणारे ठरत आहेत. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव यु. एम. फारुकी यांनी १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासन आदेश पारीत करुन वनसंरक्षणाच्या दृष्टीने नवे मापदंड ठरविले आहे. यामध्ये वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखणे, नियतक्षेत्रे तपासणी, आरागिरण्या तपासणी, वनगुन्हाची तत्परतेने नोंद, चौकशी व तपास, अवैध वृक्षतोड प्रकरणात कार्यवाही, वनसंरक्षणाबाबत दैंनदिनी अहवाल सादर करणे, वन्यप्राण्यांच्या श्किारी रोखण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी विशेष दखल घेणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. वनसंरक्षणाचे नवे मापदंड लाग करताना आरागिरण्यात सुरु असलेला गैरप्रकार थांबविण्यासाठी उपवनसंरक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरागिरण्यांच्या तपासणीचे मापदंड ठरविण्यात आल्याने मुख्य वनसंरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी असा तपासणीचा प्रवास राहणार आहे. दरमहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ८ ते १० आरागिरण्यांची तपासणी करुन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.